पुणे : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राज्याचं राजकारण चांगलेच तापताना दिसत आहे. या प्रकरणी सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती वाल्मिक कराड हा मास्टर माईंड असल्याचा आरोप करत विरोधकांकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या प्रकरणात आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उडी घेतली आहे. सोमय्या यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना लक्ष्य केले आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
वाल्मिक कराड याने दहशतीच्या जोरावर मोठ्या प्रमाणात संपत्ती मिळवली असून त्याच्यावर ईडीची कारवाई होणार का? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला होता. याबाबत बोलताना किरीट सोमय्या यांनी सप्रिया सुळेंवर शरसंधान साधलं आहे. “देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये कोणालाही सोडण्यात येणार नाही. वाल्मिक कराड हा पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होता. राष्ट्रवादी काँग्रेस आता वेगळी झाली असून जेव्हा वाल्मीक कराडला २०२२ मध्ये ईडीची नोटीस आली तेव्हा तो सुप्रिया सुळे यांच्यासोबत एकाच पक्षात होता, तेव्हा तुमचं सरकार होतं ना?” असा सवाल किरीट सोमय्या यांनी सुप्रिया सुळे यांना केला आहे.
दरम्यान, ‘वाल्मिक कराड विषय वेगळा आहे. यात कोणालाही सोडले जाणार नाही. कालपर्यंत सुळे आणि कराड हे सोबतच होते. वाल्मिक कराड नोटीस आली तेव्हा सरकार त्यांचेच होते. मी कोणाविषयी तक्रार मागे घेतली नाही’, असेही किरीट सोमय्या यांनी कराड यांच्यावरील ईडी नोटीसच्या कारवाईवर स्पष्ट वक्तव्य केलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात कंटेनरचा थरार; भरधाव वेगाने पोलिसांच्या गाडीसकट २०-२५ गाड्या उडवल्या
-कृषी मंत्र्यांकडून पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख; अजित पवार म्हणाले, ‘अरे तो पहाटेचा…’
-‘राजकीय आश्रय, मर्जीतले प्रशासन अन्…’; बीडच्या गुन्हेगारीवरुन शरद पवारांच्या आमदाराचा गंभीर आरोप
-पुणे शहर पोलीस दलातील २३ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; पोलीस आयुक्तांचे आदेश
-‘मराठवाड्याचा विकास बारामतीसारखा करणार’; पंकजा मुंडेंनी केलं अजितदादांचं कौतुक