पुणे : पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत असून मारहाण, गोळीबार, खून, बलात्कार, चोरी अशात घटना समोर येत असतात. नुकतीच स्वारगेट बस स्थानकावर झालेल्या अत्याचाराची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेने पुणे शहरासह संपूर्ण राज्य हादरुन गेले. अशा गुन्हेगारी घटनांमुळे सर्वसामान्य पुणेकरांची चिंता वाढत आहे. अशातच आता शहरातील बिबवेवाडी परिसरातील एका हिरे व्यापाऱ्याचे दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
हिरे व्यापाराच्या पत्नीने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मंगळवारी १० ते १२ संशयितांची चौकशी केली. रात्री उशिरापर्यंत व्यापाऱ्याचा ठावठिकाणा लागलेला नव्हता. याबाबत हिरे व्यापाऱ्याच्या पत्नीने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहरण झालेले हिरे व्यापारी हे त्याच्या कुटुंबासोबत बिबवेवाडी परिसरातील एका सोसायटीत राहतात. सोमवारी सायंकाळी व्यापाऱ्याने पत्नीला काही कामानिमित्त बाहेर जात असल्याचे सांगितले. त्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास अनोळखी व्यक्तीने व्यापाऱ्याच्या मोबाईलवरूनच पत्नीच्या मोबाईलवर संपर्क साधला. ‘मी तुमच्या पतीचे अपहरण केले आहे, दोन कोटी रुपये तयार ठेवा,’ असे सांगत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे पत्नीने पोलिसांना माहिती दिली आहे.
या प्रकरणात सर्व शक्यता तपासण्यात येत असल्याचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी सांगितले आहे. पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये व्यापारी सोमवारी सायंकाळी नवले पूल परिसरात असल्याचे समोर आले आहे. या भागात व्यापाऱ्याची दुचाकी आढळून आली असून, मोबाइल बंद आहे.
महत्वाच्या बातम्या-
-धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं आता आमदारकीही जाणार? धक्कादायक माहिती आली समोर
-नैतिकतेच्या आधारावर राजीनामा, पक्षाकडून पत्रक जारी; मुंडेंचा राजीनाम्याचं नेमकं कारण काय?
-मोहोळांच्या कार्यकर्त्याला मारहाण करणं महागात; गुंड गजा मारणेची तरुंगात रवानगी
-रणवीर अलहाबादियाला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; ‘पॉडकास्ट सुरू करता येणार, पण…’
-स्वारगेट अत्याचार: तपासात दररोज नवे खुलासे; पुणे पोलिसांचा घेतला ‘हा’ मोठा निर्णय