पुणे : शिरूर हवेलीच्या राजकारणात कायम चर्चेच्या अग्रस्थानी असलेलं नाव म्हणजे मंगलदास बांदल. लाल तालमीचा आखाडा असो की सभेच मैदान बांदल तुफान फटकेबाजी करणार हे निश्चित. सद्या हेच बांदल ईडीने अटक केल्याने पुन्हा चर्चेत आले आहेत. ईडीच्या धाडीत त्यांच्या घरात तब्बल ५ कोटी ६० लाखांची रोकड आणि १ कोटींची महागडी घड्याळे ४ आढळून आली. शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या ४३६ कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात बांदल तब्बल वीस महिने जेलमध्ये होते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडवर त्यांना जामीन मंजूर करण्यात आल्याने मोठी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. पैलवान असलेल्या मंगलदास बांदलांनी राजकारणात आपला दबदबा कसा निर्माण केला? अन् ४३६ कोटींच्या बँक घोटाळ्याच नेमकं प्रकरण काय? हे जाणून घेऊयात
पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती राहिलेल्या मंगलदास बांदल यांचा शिरूर – हवेली मतदारसंघात मोठा बोलबाला आहे. जिल्हा परिषदेचा सदस्य झाल्यापासून बांदल यांची पुण्याच्या राजकारणात कायम चर्चा राहिलीय. कधी उपमुख्यमंत्री अजित पवार तर कधी दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंचवार दिसून आलेल्या बांदलांच राजकारण कायम वादाचा विषय राहिलाय, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष असताना पुण्यातील सोने व्यापाऱ्याकडे ५० कोटींच्या खंडणी प्रकरणात बांदल यांना २०२० मध्ये अटक करण्यात आली होती, मोठी टीका झाल्यानंतर राष्ट्रवादीतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत बांदल यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली. मात्र वंचितने उमेदवारी दिल्यानंतरही बांदल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या इंदापूर येथील भाजपच्या मेळाव्याला ते हजर राहिले. त्यामुळे वंचितने त्यांची उमेदवारी रद्द केली. पुढे बारामतीतील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार तर शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव यांच्या प्रचारात ते सक्रियपणे दिसून आले.
लोकसभा निवडणूकपूर्वी काही दिवस आधी बांदल यांना शिवाजीराव भोसले बँकेतील 423 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणात जामीन मिळाला होता. या प्रकरणात बांदल जवळपास २० महिने येरवडा कारागृहात होते. महायुतीच्या माध्यमातून शिरूर विधानसभा लढण्याची तयारी करणाऱ्या मंगलदास बांदलांवर निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई झाल्याने पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
महत्वाच्या बातम्या–
-MPSC: ‘विद्यार्थी नसलेले काँग्रेसची लोक आंदोलन पेटवत आहेत’; रुपाली पाटलांचा गंभीर आरोप
-Pune: मागणी पूर्ण तरीही एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलनावर ठाम; नेमकं काय कारण?
-मोठी बातमी: हर्षवर्धन पाटलांनी तुतारी चिन्हावर लढण्याच्या चर्चेवर सोडलं मौन, म्हणाले…
-देशातील सर्व शाळा राजीव गांधी इ-लर्निंग सारख्या होवोत, सुप्रिया सुळेंनी केलं आबा बागुलांचे कौतुक