पुणे : पुणे पोलीस दलातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाने लोणावळ्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अण्णा गुंजाळ असे आत्महत्या केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. या घटनेने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत.
लोणावळ्यातील टायगर पॉइंटलगत त्यांनी झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. अण्णा गुंजाळ यांनी नेमकी आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. गुंजाळ हे खडकी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते. मात्र, ३ दिवसांपासून ते कर्तव्यावर नव्हते. तसेच त्यांचा संपर्कही होत नव्हता. दरम्यान, आज त्यांचा शोध लागला असता, त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
लोणावळ्यातील टायगर पॉइंटवर त्यांची गाडी सुद्धा आढळलेली आहे, या गाडीत एक डायरी आहे. कदाचित या डायरीमध्ये त्यांच्या आत्महत्येमागचं कारण दडलेलं असू शकतं. लोणावळा ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोहचलेले असून खडकी पोलीस ही घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. पोलिसांकडून त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून पॉइंटवर असलेली गाडीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. आता, या कारमधील डायरीत त्यांनी मृत्यूपूर्व काही लिहून ठेवले आहे का, याचा तपास पोलिसांकडून घेतला जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-ठाकरेंच्या पुणे दौऱ्याआधीच ‘या’ नेत्यावर सोपवली मोठी जबाबदारी, ठाकरेंचा ‘मास्टर प्लान’ काय?
-पालिकेच्या स्थायी समिती बैठकीत पुणेकरांच्या करवाढीसाठी महत्वाचा निर्णय
-Pune GBS: ‘जीबीएस’मुळे पुण्यात आणखी एकाचा मृत्यू; रुग्णसंख्या १७३ वर
-‘महायुतीच्या बातम्या द्या नाहीतर…’; अजितदादांचा AK47 हातात घेऊन निशाणा कोणावर?
-मुख्यमंत्री फडणवीसांसमोर पुन्हा एकदा पॉलिकल ड्रामा; अजितदादांनी आमदार लांडगेंना सुनावलं