पुणे : महापालिकेच्या शरही गरीब योजने अंतर्गत शहरातील गरजू रुग्णांना उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी अर्थिक मदत देण्यात येते. पालिकेच्या या योजनेतून अनेक गरजूंना लाभ होत असतो. मात्र, या योजनेतून नाना पेठेमधील एका खाजगी रुग्णालयाने पालिकेची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
शहरी गरीब योजनेंतर्गत उपचार घेण्यासाठी १० रुग्णांच्या हमीपत्रांपैकी केवळ ३ रुग्णांच्या नोंदी नाना पेठेतील एका खासगी रुग्णालयाने केल्याची बाब उघडकीस आली आहे. संबधित रुग्णालयाने न केलेल्या शस्त्रक्रियेचे बिल महापालिकेला सादर करुन फसवणूक केल्याचे उघडकीस आले. रुग्णांच्या नावे बनावट प्रकरणे तयार करुन महापालिकेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी अधिक तपास केला जात आहे.
अशा तऱ्हेने महापालिकेची फसवणूक केल्या प्रकरणी पालिकेचे वैद्यकीय अधिकारी शरद प्रकाश चव्हाण (वय ३४) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नाना पेठेतील एका डाॅक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाना पेठेतील क्वार्टर गेट चौकात संबधित रुग्णालय आहे, अशी माहिती समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट, वॉन्टेंड आरोपींना पुण्यातून अटक
-अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या ‘सरकार्यवाह’पदी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ
-भगवान श्री ऋषभ फकीर “नीलमणी” पंचमी महोत्सवात अनुभवायला मिळणार आत्मशांतीची दिव्य अनुभूती
-ठाकरेंचे शिलेदार भाजपमध्ये अन् महायुतीत ठिणगी, ‘धनुष्यबाणाच्या जागा…’ शिंदेंचे शहराध्यक्ष भिडले