पुणे : येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अनेक जागांसाठी रस्सीखेच सुरु आहे. मावळ मतदारसंघात महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये चुरस पहायला मिळत आहे. त्यातच आता मावळमध्ये भाजपकडून ‘राष्ट्रवादी’विरुद्ध छुपा प्रचार करण्यात येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
पवना बंदिस्त जलवाहिनीच्या विरोधात झालेल्या आंदोलनावरील गोळीबारात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांना धारेवर धरणाऱ्या भाजपची अडचण झाली आहे. पवार हे महायुतीत आल्याने उघडपणे टीका करता येत नसल्याने भाजपने छुप्या पद्धतीने टीकेला सुरुवात केली आहे. यावरुन आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद उफाळून आला आहे.
मावळमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके असा राजकीय संघर्ष असला तरी त्याला निमित्त पवना बंदिस्त जलवाहिनी ठरल्याचं दिसत आहे. त्यामुळे महायुतीमध्ये भाजपसोबत असूनही राष्ट्रवादीसाठी गोळीबाराचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस विशेष म्हणजे सुनील शेळकेंच्या अडचणीचा मुद्दा ठरु शकतो.
महत्वाच्या बातम्या-
-ओबीसी-मराठा कार्यकर्त्यांचा ससून रुग्णालयात राडा; २०-२५ मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल
-जुन्नरमध्ये ठरलं! राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना रंगणार
-‘त्यांच्यासोबत जात मतदान केलं तर तुम्हाला सौ..’; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
-शरद पवारांच्या बैठकानंतर संभाव्य बंड टाळण्यासाठी अजितदादा घेणार कार्यकर्त्यांची शाळा
-भोसरीमध्ये आघाडीत वादाची शक्यता; ठाकरेंचा नेता पवारांच्या भेटीला