पुणे : दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (SP) अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. तसेच शरद पवारांनी या कार्यक्रमामध्ये बोलताना एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. यावरुन राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या. शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा केलेला सत्कार ठाकरेसेनेच्या काही पचनी पडला नाही. या कार्यक्रमावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून शरद पवारांवर टीका केली आहे. कार्यक्रम झाला दिल्लीत राऊतांनी टीका केली मुंबईत मात्र आता याचे वादंग उठले ते पुण्यात.
खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टिकेवरुन आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि ठाकरे सेनेचे नेते वसंत मोरे यांच्यात वाक्ःयुद्ध जुंपल्याचे पहायला मिळत आहे. प्रशांत जगताप यांनी संजय राऊतांच्या टीकेला उत्तर देताना, “२५ वर्षे खासदार असलेल्या राऊत यांना व्यापक दृष्टी मिळाली नाही, ती शरद पवार यांच्याकडे आहे, ते राजकारणाच्या पलीकडे पाहू शकतात. राऊत यांनी राजकारणाचा पोरखेळ केला आहे”, अशी टीकाही केली आहे.
संजय राऊतांवर केलेल्या टीकेला वसंत मोरेंनी उत्तर देताना ‘राजकारणाचा पोरखेळ कोणी केला ते संपूर्ण राज्याला माहिती आहे’, असे म्हणाले आहेत. “राऊत यांच्या टिकेला शरद पवार हेच जबाबदार आहेत. राऊत नेहमीच त्यांच्या रोखठोक भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत. महाविकास आघाडीत असताना त्यांनी असे करावे ते काही बरोबर नाही, मात्र वरचे नेते काय ते बघून घेतील, पवार त्यांना काय ते उत्तर देतील. प्रशांत जगताप यांनी त्यावर बोलू नये. यामुळे महाविकास आघाडीत काही फरक पडेल असे वाटत नाही. कारण शरद पवार हे जबाबदार नेते आहेत, ते काही चुकीची भूमिका घेतील असे वाटत नाही”, असे वसंत मोरे म्हणाले.
दरम्यान, संजय राऊतांनी शरद पवारांवर दिल्लीतील कार्यक्रमावरुन पुण्यातील मविआच्या नेत्यांमध्ये कलगितुरा रंगल्याचे पहायला मिळाले. त्यानंतर आता महाविकास आघाडीमध्ये या संपूर्ण प्रकरणाचे काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ला ब्रेक, कमिटमेंटमुळे रखडला माजी आमदाराचा प्रवेश?
-मनसेच्या इशाऱ्यानंतर भाडिपाचा पुण्यातील ‘तो’ शो रद्द; सारंग साठ्ये म्हणाला, ‘आगीत तेल…’
-Entertainment: लग्नाआधी शारीरीक संबंध? ऐश्वर्या रायने स्पष्टच सांगितलं…
-‘सोलापूरकर जितके दोषी तितकेच तुम्हीही’; अमोल मिटकरींनी पोलीस आयुक्तांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
-RTO: ३१ मार्चपूर्वी गाडीच्या नंबर प्लेटमध्ये करावा लागणार ‘हा’ बदल, अन्यथा…