पुणे : कल्याणीनगरमध्ये झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणामधून सर्वात महत्वाची अपडेट आता समोर आली आहे. अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदण्यासाठी बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना मदत केल्याप्रकरणी गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई करण्यात आली असून या प्रकरणी आणखी २ जणांना अटक केली आहे.
आदित्य अविनाश सूद (वय ५२) आणि आशिष सतीश मित्तल (वय ३६) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. अटक केलेले सूद आणि मित्तल हे दोघेही ससूनमधील डॉ. अजय तावरेच्या संपर्कात असल्याचे पोलीस तपासांत उघड झाले आहे. त्यामुळे आरोपीला वाचवण्यासाठी रक्ताचे नमुने बदलण्यात या दोघांनीही मदत केल्याने दोघांनी अटक केली आहे.
१९ मे रोजी कोरेगाव पार्क परिसरातील कल्याणीनगरमध्ये मध्यरात्री झालेल्या अपघातामध्ये बड्या बिल्डरपुत्राने भरधाव कारने २ तरुणांना जबर धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी हा अल्पवयीन आणि बड्या बिल्डरचा मुलगा असल्याने अनेक पातळीवर त्याला वाचण्याचे प्रयत्न करण्यात आले. या प्रकरणाला राजकीय वळणही लागल्याचे पहायला मिळाले. त्यातच अग्रवाल कुटुंबाला ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी देखील मदत केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी अनेक संशयितांना तसेच आरोपीला वाचवण्यासाठी मदत करणाऱ्यांना लाचखोरांना अटक केली असून आज आणखी दोघांना अटक केली आहे. आज अटक केलेल्या मित्तल आणि सूद यांना दुपारी न्यायालयामध्ये हजर करुन अधिक तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मराठा आरक्षणाबाबतच्या संभाजी भिडेंच्या वक्तव्यावरुन शरद पवारांनी काढली लायकी, नेमकं काय झालं?
-ऐन विधानसभेच्या तोंडावर महायुतीत राडा; जगदीश मुळीकांनी काढली अजित पवारांच्या आमदाराची पात्रता
-पुण्यात ट्रॉफिक पोलिसांचं अनोखं रक्षाबंधन; वाहन चालकांकडून ओवाळणी म्हणून घेतलं ‘हे’ महत्वाचं वचन
-सुप्रियाताई-अजितदादा रक्षाबंधन साजरा करणार का? अजित पवार म्हणाले, ‘तिच्याकडे…’
-‘बारामतीतून निवडणूक लढविण्यात रस नाही’ अजितदादांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले, ‘जिथून…’