पुणे : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये झालेल्या २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार प्रकरणात महत्वाची अपटडे समोर आली आहे. स्वारगेट बस डेपोमध्ये एका शिवशाही बसमध्ये पहाटेच्या सुमारास एका २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाला. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरुन गेले होते. सर्वसामान्यांच्या मनात बसस्थानकावर जाण्याची चांगलीच भीती देखील बसली होती. या प्रकरणाची दखल राज्य सरकारकडून घेण्यात आली असून आता राज्य परिवहन मंडळाचे पुणे प्रदेशाचे व्यवस्थापक व पुणे विभागाचे नियंत्रकाची तडकाफडकी बदली करण्यात आली होती.
या घटनेची एसटी प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली होती. घटनेनंतर काही दिवसांतच आगार व्यवस्थापक जयेश पाटील, कनिष्ठ आगार व्यवस्थापक पल्लवी पाटील व स्थानक प्रमुख मोहिनी ढेरे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. त्यानंतर प्रादेशिक व्यवस्थापक व विभाग नियंत्रकासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर बदलीची कारवाई केली आहे. पुण्याच्या प्रादेशिक व्यवस्थापक अनघा बारटक्के यांची बदली नागपूरला करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नागपूरमधील श्रीकांत गभणे यांची नियुक्ती केली आहे.
पुणे विभागाच्या ७ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. प्रादेशिक व्यवस्थापक अनघा शैलेश बारटक्के, प्रादेशिक व्यवस्थापक श्रीकांत मुधकरराव गभणे, विभाग नियंत्रक प्रमोद संभाजी नेहूल, विभाग नियंत्रक अरुण भगतसिंग सिया, यंत्र अभियंता पंकज गेणू ढावरे, अधिक्षक स्मिता सुरेश कुलकर्णी, वरिष्ठ सुरक्षा व दक्षता अधिकारी गिरिश वसंतराव यादव अशी बदली केलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुरुषांचेच व्हिडीओ करत होता शूट; मोबाईल चेक केल्यानंतर धक्कादायक सत्य आलं समोर
-‘…तर कुणाल कामराचा आबरा का डाबरा करणार’ पुण्यात शिवसैनिक आक्रमक
-हिंजवाडी जळीत हत्याकांड: ‘माझ्या नवऱ्याला विनाकारण अडकवलं जातंय’; बस चालकाच्या पत्नीचा दावा
-सरकारी शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू; छत्रपती शिवराय, छत्रपती शंभूराजांचा इतिहास अनिवार्य असणार
-‘वाघ बाई स्वतःच्या राजकीय करियरसाठी…’; सुषमा अंधारेंची चित्रा वाघ यांच्यावर आगपाखड