पुणे : लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेमध्ये आरक्षण रद्द करण्याबाबत भूमिका मांडली आहे. यावरुन आता पुणे शहरात शिंदेंची शिवसेना आक्रमक झाली असल्याचे पहायला मिळत आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या नेतृत्वात पुण्यातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर तीव्र निषेध आंदोलन करुन राहुल गांधींनी समस्त भारतीयांची माफी मागावी अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. महिला शिवसैनिकांनी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला चप्पल मारून निषेध व्यक्त केला.
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी त्यांच्या अमेरिकेतील खासगी दौऱ्यात एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देशातील आरक्षण कमी करत संपवण्याची वेळ आल्याची विधान केले होते.त्यामुळे अनसुचित जाती जमाती, आणि इतर मागासवर्गीय नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात मुलभुत हक्क या घटकात कलम १७ आणि १८ अन्वये समाजातील दुर्बल घटकांना आरक्षण दिले आहे असे असताना आरक्षण रद्द करण्याचे विधान संतापजनक आहे.
‘राहुल गांधी यांनी वेळोवेळी संविधान विरोधी विधाने केली असून, लोकसभा प्रचारादरम्यान माध्यमांमध्ये त्यांनी उघडपणे पत्रकार परिषदेत या पत्रकार परीषदेत किती वार्ताहर मागास प्रवर्गातील आहेत?किती छायाचित्रकार मागास प्रवर्गातील आहेत असे प्रश्न विचारून आपण संविधान विरोधी आहोत हे दाखवून दिले आहे. विरोधी पक्षनेता हे अत्यंत जवाबदारीचे काम आहे, वेळोवेळी राहुल गांधी यांनी विनाकारण सामाजिक सलोखा बिघडेल असे विधान केले आहे. पुणे शहर शिवसेना राहुल गांधी यांच्या या आरक्षण विरोधी वक्तव्याचा जाहीर निषेध करीत असून राहुल गांधी यांनी जर माफी मागितली नाही तर अत्यंत उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल’, असेही शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात विधानसभेचे मतदारसंघ ८ अन् महाविकास आघाडीच्या इच्छुकांची संख्या ८५; कसं असणार जागावाटप?
-पुण्यात विधानसभेच्या ८ मतदारसंघात महाविकास आघाडीच्या इच्छुकांची संख्या ८५
-पुणेकरांनो सावधान! झिकाचा प्रादुर्भाव वाढतोय; आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू तर रग्णसंख्या किती?
-पर्वतीमध्ये आबा बागुलांना वाढता पाठिंबा; गणेशोत्सवाच्या माध्यमातून प्रचाराची एक फेरी पूर्ण
-Ganesh Festival: काश्मीरमधील बाप्पाला भव्य विसर्जन मिरवणुकीने भावपूर्ण निरोप