पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. अनेक मतदारसंघामध्ये निवडणुकीसाठी इच्छुक नेत्यांची भाऊगर्दी पहायला मिळाली. उमेदवारीवरुन रस्सीखेच सुरु आहे. अशातच आता काही इच्छुक नेत्यांना महामंडळाची पदे देण्यात आली. मात्र विधानसभेची तयारी करत असलेल्या इच्छुकांची गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघातून तयारी करणाऱ्या भाजपचे माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले भाजपने पत्ता कट करुन त्यांना राज्य कंत्राटी कामगार सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपद दिले आहे. यानंतर आज श्रीनाथ भिमाले यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे.
“मी विधीमंडळाची मागणी केली आहे महामंडळाची नाही. माझी पर्वती मतदारसंघातून आमदारकी लढायची आहे. माझी पूर्वी पण हीच मागणी होती आजही आहे. माझी ‘लढणार आणि जिंकणार’ ही टॅगलाईन आजही आहे आणि उद्याही असणार आहे. मला कोणतंही अधिकृत पत्र पक्षाकडून आले नाही. कोणत्याही पदाधिकाऱ्याने फोन केलेला नाही. मी विधीमंडळाचा मागणी केली आहे पर्वतीतून आमदारकी लढण्याचा निर्धार केलेला आहे. त्यावर मी आजही ठाम आहे”, असे म्हणत श्रीनाथ भिमाले यांनी पर्वतीतून आमदारकी लढण्याचा निर्धार कायम असल्याचे सांगितले आहे.
“पर्वतीमधून मला उमेदवारी मिळेल, अशी मला वरिष्ठांकडून आशा आहे. आणि मी पर्वतीतून आमदार होईल अशी मला आशा आहे. मी गेल्या १५ वर्षांपासून मागणी करत आहे. आताही केली आहे. उद्या ही मागणी पूर्ण होईल. पर्वतीमधून मी लढणार हे निश्चित आहे. आणि लढलो तर जिंकणारच आहे”, असे श्रीनाथ भिमाले म्हणाले आहेत.
दरम्यान, भिमाले यांनी मतदारसंघात आमदारकीसाठी केलेली तयारी त्यात त्यांनी नुकतंच देण्यात आलेले राज्य कंत्राटी कामगार सल्लागार महामंडळाचे अध्यक्षपद दिल्यानंतरही त्यांची विधीमंडळाची मागणी कायम असल्याने भाजपकडून आता काय निर्णय घेतला जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“भोसरीच्या मातीत समोरच्याला उचलून टाकणारे पैलवान जन्माला येतात, चावणारे नाही” -महेश लांडगे
-दीपक मानकरांच्या पत्रकार परिषदेनंतर रुपाली चाकरणाकरांची प्रतिक्रिया म्हणाल्या…
-अजितदादांचा शिलेदार शांत बसेना! मावळात शेळकेंची डोकेदुखी काय?
-पुण्यातील ‘या’ चार मतदारसंघाचा पेच काही सुटेना! महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी
-ईडीची मोठी कारवाई; मंगलदास बांदलांची कोट्यावधींची मालमत्ता जप्त