पुणे : पुणे शहरातील नामांकित रुग्णालयापैकी एक असणाऱ्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं नाव मोठं अन् लक्षण खोटं असल्याचं स्पष्ट झालं आहे. रुग्णालायाला एखाद्याच्या जीवापेक्षा पैसा महत्वाचा असल्याचं रुग्णालायकडून दिसून आलं आहे. प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. प्रसूतीचा त्रास होत असणाऱ्या तनिषा भिसे यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात आलं मात्र, रुग्णाला भरती करुन घेण्याऐवजी आधी २० लाख रुपये भरा मग उपचार सुरु करु असं रुग्णालायकडून सांगण्यात आलं. इतकी रक्कम ताबडतोब भरणं शक्य नाही म्हणून मुख्यमंत्री सहायता कक्षाला फोन करुन कळवण्यात आले. तिथून रुग्णालयाला फोनही करण्यात आला मात्र तरीही तिला दाखल करुन घेतलं नाही.
आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक असणारे रुग्णाचे पती सुशांत भिसे यांनी अखेर पत्नी तनिषाला दुसऱ्या रुग्णालयामध्ये दाखल केलं. तिने २ गोंडस मुलींना जन्म दिला मात्र, अतिरक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला. जन्माला येताच या दोन्ही मुली पोरक्या झाल्या. या घटनेवरुन राज्यभर संतापाची लाट उसळली. रुग्णालया बाहेर सुरु असलेल्या आंदोलनामध्ये एक महिला आली तिने देखील प्रतिक्रिया दिली आहे.
“मी पण माझी एक मुलगी गमावली मुंबईमध्ये 29 वर्षांची एक पोरगी मी गमावली आहे. सगळं काही करून बसले, आंदोलन केलं. कही झालेलं नाही. मी आज माझ्या पोरीचं बारकं पोरगं संभाळते. मला माहिती आहे काय वेदना होतात. लक्षात घ्या, ही अंधाधुदी बंद करा आणि गरीबांचा वाली व्हा” असंही यावेळी एका संतप्त महिलेनं म्हटलं आहे. “काल वेदनेनं तडफडत असलेल्या त्या महिला रूग्णाची जबाबदारी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने का घेतली नाही?. त्यावेळी त्यांची संवेदनशीलता कुठे गेली होती?”, असा संतप्त सवाल यावेळी आंदोलक महिलांकडून विचारला गेला.
दीनानाथ रुग्णालायाविरोधात जवळपास सर्व राजकीय पक्षांकडून रुग्णालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. शिवसेनेच्या दोन्ही गटाने, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तसेच काही सामाजिक संघटनांकडून देखील आक्रमक पवित्रा घेण्यात आला. रुग्णालयाच्या बोर्डावर काळं फासलं तर कोणी शाईफेक केली. भाजपच्या महिला कार्यकर्त्यांकडून डॉक्टर दिलीप घैसास, चिन्मय घैसास यांच्या रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली. तसेच रुग्णालय प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली.
महत्वाच्या बातम्या-
-‘रुग्णालयाच्या ट्रस्टींवर मुनष्यवधाचा गुन्हा दाखल करा’; काँग्रेसकडून रुग्णालयाच्या बोर्डावर शाईफेक
-मंगेशकर रुग्णालयाची स्वतःलाच क्लीनचीट, ‘ऍडव्हान्स मागितल्याच्या रागातून त्यांनी…”
-हृदयद्रावक! ती ८ वर्षांनी पहिल्यांदाच आई होणार होती, पण दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने घातलं विरजण
-दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर आरोग्य मंत्र्यांचे कारवाईचे आदेश; आता सगळीच चौकशी होणार