पुणे : पुण्यासह राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून सध्या शिरूर आणि अहिल्यानगरच्या हद्दीवर असलेल्या दाणेवाडी गावात एका तरुणाची निघृण हत्या करण्यात आली आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा उलगडा करण्यास अखेर पोलिसांना यश आले आहे. समलैंगिक संबंध समजले म्हणून समलैंगिक जोडप्याने माऊली गव्हाणे या १९ वर्षे तरुणाची अमानुष हत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सागर दादाभाऊ गव्हाणे हा या घटनेतील मुख्य आरोपी असून त्याला साथ देणारा दुसरा आरोपी हा अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे.
सागर गव्हाणे याचे एका अल्पवयीन मुलासोबत समलैंगिक संबंध होते. हे समलैंगिक संबंध असल्याचे माऊली गव्हाणेला समजले म्हणून समलैंगिक जोडप्याने संगनमताने माऊलीची हत्या केली. हा खून केल्याचे आरोपींकडून सांगण्यात आले आहे. दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.
दाणेवाडी गावातील एका विहिरीत १२ मार्च रोजी एक अनोळखी मृतदेह आढळला होता. मृतदेहाचे शीर आणि पाय तोडून मृतदेह विहिरीत टाकून देण्यात आला होता. तर दुसरीकडे याच दाणेवाडी गावातील माजी सरपंच अनिल गव्हाणे यांचा १९ वर्षीय पुतण्या माऊली गव्हाणे हा देखील ६ मार्चपासून शिरूर येथून बेपत्ता झाला होता. एका विहीरीत मृतदेह तर एका गोणीमध्ये मानवी शीर, शरिराचे काही अवयव तसेच पाय तोडून दुसऱ्या विहीरीमध्ये आढळले. यामध्ये अढलेल्या शिराच्या कानात असलेल्या बाळीवरुन हा मृतदेह माऊलीचा असल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून समलैंगिक संबंध होते. या संबंधाबाबत माऊली गव्हाणे याला माहिती झाले होते. त्याने ही गोष्ट कुणाला सांगू नये, यासाठी आरोपींनी गुरुवारी, ६ मार्च रोजी दुपारच्या सुमारास माऊली याच्याशी चर्चा करण्याच्या बहाण्याने संवाद साधला. त्याला त्याच रात्री ११.३० वाजता भेटण्याचे ठरले. त्यांनी टॉर्चच्या उजेडाचा संकेत देऊन माऊलीला एका ठिकाणी बोलावून घेतले. यानंतर, दोघांनी निर्घृणपणे माऊलीला गळा आवळून ठार मारले. खून केल्यानंतर आरोपींनी मृतदेहाचे तुकडे करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी इलेक्ट्रिक कटरच्या मदतीने हात, पाय, धड आणि डोके वेगवेगळे केले. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाचे भाग वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. शीर, एक पाय आणि दोन हात घोड नदीच्या काठावर असलेल्या विहिरीमध्ये टाकण्यात आले.
महत्वाच्या बातम्या-
-पोर्शे कार प्रकरणाची सुनावणी लवकरच सुरु होणार; सरकारी वकील कोण असणार?
-तृप्ती देसाई बीडमध्ये दाखल; ‘त्या’ 26 अधिकाऱ्यांविरोधातले पुराव्यांचा पेन ड्राईव्ह केला सादर
-‘त्यांनी ‘जय शिवराय’ नाही, तर ‘अल्ला हू अकबर’ म्हणावं’; नितेश राणेंनी राष्ट्रवादीला डिवचलं
-पत्नी आमदार तरीही पतीदेवांना विधान परिषदेची लॉटरी, अजितदादांचा पुण्यातील नेत्यांना ठेंगा
-डॉक्टरांकडूनच होतेय परस्पर औषधांची विक्री, FDAची मात्र डोळेझाक, कारवाई कधी होणार?