पुणे : चीन देशात ‘ह्यूमन मोटान्यूमो’ (HMPV) व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चालला असून या व्हायरसने चीनमधील अनेकांचे बळी गेले आहेत. या विषाणूचा भारतात आणि महाराष्ट्रातही शिरकाव झाल्याने भारतीयांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत आता धक्कादायक माहिती समोर मिळत आहे. पुण्यामध्ये २००४ सालीच एचएमपीव्ही व्हायरसची लागण झाल्याचे रुग्ण आढळून आले आहेत. बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय तसेच ससून सर्वोपचार रुग्णालयात गेल्या २ वर्षात HMPV व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची नोंद झाली आहे.
जुलै २००३ मध्ये ससून सर्वोपचार रुग्णालयात श्वसनविकाराची लक्षणे असलेली काही मुलांना दाखल करण्यात आलं होते. त्यांच्यात तीव्र स्वरूपाची लक्षणे दिसून येत होती. त्यामुळे राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) या मुलांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यावेळी ससूनमधून एकूण १९ मुलांचे नमुने पाठविण्यात आले. त्यातील ५ मुलांना एचएमपीव्हीचा संसर्ग झाल्याचे एनआयव्हीच्या अहवालातून समोर आले. ससून रुग्णालयात २०२३ आणि २०२४ मध्ये दाखल झालेल्या २० जणांना एचएमपीव्हीचे निदान झाले होते.
एचएमपीव्हीची लक्षणे ही सर्दीसारखी असतात. वयाच्या पाचव्या वर्षांपर्यंत प्रत्येकाला या विषाणूचा संसर्ग होऊन गेलेला असतो. त्यातून या आजाराविरोधात शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण होते. त्यामुळे एचएमपीव्हीबाबत विनाकारण भीतीचे वातावरण निर्माण करण्याची आवश्यकता नाही, असे बी.जी. वैद्यकीय महाविद्यालयचे सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘तुम्हाला जमत नसेल तर पदं सोडा’; अजितदादा नेमकं कोणावर भडकले
-“‘ती’ योजना बंद केली तर महिलांशी…”; ‘लाडकी बहिण’बाबत चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य
-ठाकरेंची साथ सोडली भाजपमध्ये प्रवेश, तरीही नगरसेवक म्हणतात, ‘खरी शिवसेना ठाकरेंचीचं’
-‘घोडगंगा कारखाना’ अजित पवारांच्या रडारवर; मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, अशोक पवारांचं टेंशन वाढलं