पुणे : पुणे शहरातील हिंजवडी फेज १ मध्ये व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या एका मीनी बसला आग लागल्याची दुर्घटना बुधवारी सकाळी घडली. या घटनेमध्ये बस चालकानेच सहकर्मचाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आग लावली असल्याचं धक्कादायक सत्य पोलिसांनी केलेल्या चौकशीतून समोर आले आहे. आग लावली, बसमधून सुखरुप बाहेर पडला आणि बेशुद्ध झाल्याचं नाटक केलं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर काल त्याने केलेल्या कृत्याची पोलिसांना कबुली दिली आहे. या जळीत हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार म्हणून पोलिसांनी बस चालक जनार्दन हंबर्डीकर याच्याविरोधात कट रचून खून केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
जनार्दनने स्वत: कबुली जबाब दिला असूनही त्याच्या पत्नी आणि भावाने या प्रकरणात जनार्दनला नाहक गोवले जात असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. जनार्दन हंबर्डीकरने केलेल्या कृत्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. बसमध्ये शॉर्ट सर्किटने आग लागल्याचे चालकाला भासवायचं होतं. पण शॉर्ट सर्किटने लागलेली आग अगदी काही क्षणार्धात भडका उडाला. या गोष्टीचा संशय पोलिसांना आल्यामुळे त्यांनी अधिक खोलात जाऊन चौकशी केली त्यानंतर हे सर्व धक्कादायक माहिती समोर आली आहे.
माझा भाऊ निर्दोष असून त्याला या प्रकरणात गोवलं जातंय. जर त्याने ते केमिकल कंपनीतून घेतल्याचा दावा केला जातो. पण, ज्या कंपनीतून एक छोटा कागद घेऊन जाऊ शकत नाही त्या कंपनीतून त्याने हे केमिकल कसं नेलं. ते कॅन नेत असताना त्याला का अडवलं गेलं नाही. हा माझा आक्षेप आहे. सकाळपासून तो स्टेबल नसताना पोलिसांनी त्याची दोन ते अडीच तास काय माहिती घेतली. त्याची स्थिती ठिक नसताना पोलीस त्याच्याकडून अडीच ते तीन तास स्टेटमेंट घेतात. जर त्याने गाडी लॉक केली तर त्यामध्ये तीन लोक असे आहेत की त्यांना खरचटल देखील नाही. जर त्याने दरवाजा लॉक केला असताना तर मग हे लोक कसे बाहेर आले, असे अनेक प्रश्न आरोपी जनार्दनच्या भावाने उपस्थित केले आहेत.
त्या बसमध्ये माझे भाऊजी विश्वास खानविलकर देखील होते. ते सर्वजण बाहेर पडल्यानंतर ते सर्वात शेवटी बाहेर पडले होते. दरवाडा उघडा होता त्यामुळे ते बाहेर पडले. असा कोणता भाऊ असेल जो आपल्या बहिणीचं कुंकू पुसायला तयार असेल. माझा भाऊ निर्दोष आहे. आम्हाला न्याय मिळावा, असं विजय हंबर्डीकर चालक जनार्दन हंबर्डीकरच्या भावाने म्हटलं आहे.
पैसे न मिळाल्याची कारणे सांगितली जात आहेत ती खोटी असून माझ्या नवऱ्याने मला दिवाळीला त्यांनी पैसे दिले होते. त्यांना पैसे मिळाले नसते तर त्यांनी मला पैसे दिलेच नसते. ते २००६ पासून तिथे होते. जर त्या कंपनीतील लोकांना ते केमिकल घेऊन जाताना दिसले तर त्यांनी त्याबद्दल विचारायला हवं होतं. त्यांना या प्रकरणात गोवलं जात आहे. नक्की काय खरं आहे खोटं आहे याचा तपास झाला पाहिजे माझ्या नवऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, असे चालकाची पत्नी म्हणाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-सरकारी शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू; छत्रपती शिवराय, छत्रपती शंभूराजांचा इतिहास अनिवार्य असणार
-‘वाघ बाई स्वतःच्या राजकीय करियरसाठी…’; सुषमा अंधारेंची चित्रा वाघ यांच्यावर आगपाखड
-जयकुमार गोरेंवर विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप करणाऱ्या महिलेला अटक; नेमकं कारण काय?
-स्वारगेट प्रकरणी पीडितेचा आवाज बसबाहेर गेला?; शिवशाहीची शास्त्रोक्त पडताळणी, काय माहिती मिळाली?
-धक्कादायक! बसला लागलेली आग अपघात नव्हे तर नियोजित कट; कोणी घडवून आणला हा प्रकार?