पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर भागामध्ये गेल्या काही महिन्यांपूर्वी पोर्शे कार अपघात प्रकरणाने राज्यासह देशभर खळबळ उडाली. या अपघातामध्ये बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत दुचाकीस्वारांना चिरडलं. त्यामध्ये दुचाकी स्वारांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात अनेक मोठमोठे खुलासे झाले. या प्रकरणाला राजकीय वळण लागल्याचंही पहायला मिळालं. या प्रकरणी ससून रुग्णालयातील डॉक्टर्सचे निलंबन करण्यात आले. आता या प्रकरणाची न्यायालयामध्ये लवकरच सुनावणी सुरु होणार आहे.
या प्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल याच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. अल्पवयीन मुलाविरुद्ध दाखल गुन्ह्याचे कामकाज बाल न्याय मंडळाकडून पाहण्यात येत आहे. तर अग्रवाल दाम्पत्य, डॉ. तावरे, डॉ. हाळनोर, तसेच अन्य आरोपी येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. पुरावा नष्ट केल्याप्रकरणी अग्रवाल दाम्पत्यासह अन्य आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. याबाबतची सुनावणी लवकरच शिवाजीनगर न्यायालयामध्ये सुरु होणार असून या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून शिशिर हिरे हे असणार आहेत, अशी माहिती अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी दिली आहे.
अल्पवयीन मुलाला वाचविण्यासाठी अग्रवाल, त्याची पत्नी शिवानी यांनी ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर यांच्याशी संगनमत करुन रक्ताचे नमुने बदलले होते. पुरावा नष्ट केल्याप्रकरणी त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. कल्याणीनगर भागात अपघात झाल्यानंतर अल्पवयीन मुलाला वाचविण्यासाठी आजोबा बांधकाम व्यावसायिक सुरेंद्रकुमार अग्रवाल, वडील विशाल यांनी मोटारचालकाला धमकाविले होते.
महत्वाच्या बातम्या-
-तृप्ती देसाई बीडमध्ये दाखल; ‘त्या’ 26 अधिकाऱ्यांविरोधातले पुराव्यांचा पेन ड्राईव्ह केला सादर
-‘त्यांनी ‘जय शिवराय’ नाही, तर ‘अल्ला हू अकबर’ म्हणावं’; नितेश राणेंनी राष्ट्रवादीला डिवचलं
-पत्नी आमदार तरीही पतीदेवांना विधान परिषदेची लॉटरी, अजितदादांचा पुण्यातील नेत्यांना ठेंगा
-डॉक्टरांकडूनच होतेय परस्पर औषधांची विक्री, FDAची मात्र डोळेझाक, कारवाई कधी होणार?