पुणे : पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून पुण्यातील एरंडवणे भागातील एका लॉन्समधील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्याचे भाजपचे पदाधिकारी पुनीत जोशी यांच्यातर्फे नृत्य महोत्सवाचे आयोजन शनिवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी एक जण स्वच्छतागृहात व्हिडिओ काढत असल्याची आरोळी उठली आणि एकच गोंधळ उडाला. घटनास्थळावरुन पळून जात असलेल्या आरोपीला काही कामगारांनी पकडलं आणि बेद चोप दिल्याचे पहायला मिळाले आहे. या प्रकरणी आता व्हिडीओ शूट करणाऱ्याविरोधात अलंकार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगेश नंदकुमार जवाहिरे (वय ३५ वर्ष, रा. अजिंक्य हाईट्स, कात्रजगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. स्वच्छतागृहामध्ये व्हिडीओ शूट करणाऱ्या तरुणाला तेथील नागरिकांनी रंगेहात पकडले, चांगलाच चोप दिला. त्याने महिलांच्या स्वच्छतागृहातील व्हिडीओ शूट केल्याचा सर्वांचा समज होता. मात्र, त्याचा फोन चेक केला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. या तरुणाने पुरुषांच्या स्वच्छतागृहात लघुशंका करतानाचे व्हिडिओ शूट केले होते.
दरम्यान, नागरिकांनी स्वच्छतागृहामध्ये व्हिडीओ काढणाऱ्याला चोप दिल्यानंतर पोलिसांना बोलवण्यात आले. यावेळी आरोपीच्या फोनमध्ये पोलिसांनी पुरुषांचा लंघूशंका करतानाचे व्हिडीओ पोहिले अन् ते पाहून पोलिसांनाही धक्काच बसला. व्हिडीओ शूट करणाऱ्या तरुणाविरोधात ४८ वर्षीय व्यक्तीने पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यावरुन आरोपी मंगेश विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘…तर कुणाल कामराचा आबरा का डाबरा करणार’ पुण्यात शिवसैनिक आक्रमक
-हिंजवाडी जळीत हत्याकांड: ‘माझ्या नवऱ्याला विनाकारण अडकवलं जातंय’; बस चालकाच्या पत्नीचा दावा
-सरकारी शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू; छत्रपती शिवराय, छत्रपती शंभूराजांचा इतिहास अनिवार्य असणार
-‘वाघ बाई स्वतःच्या राजकीय करियरसाठी…’; सुषमा अंधारेंची चित्रा वाघ यांच्यावर आगपाखड
-जयकुमार गोरेंवर विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप करणाऱ्या महिलेला अटक; नेमकं कारण काय?