पुणे | इंदापूर : राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु झाली आहे. गेल्या दीड वर्षांपूर्वी राज्यात फुटाफुटीचं राजकारण पहायला मिळालं. पक्षफुटीनंतर शरद पवारांचा पक्ष कमकुवत झाला होता. परंतु आता पुन्हा पक्षाला उभारी मिळत असून पक्षात चांगलेच इनकमिंग सुरु आहे. यातच आज भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. त्यावेळी पाटलांनी पक्षप्रवेश करण्याअगोदर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटू घेऊन चर्चा केल्याचे माध्यमांना सांगितले.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याअगोदर मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यांच्यात आणि माझ्यात अंदाजे दोन तास चर्चा झाली. गेल्या अनेक वर्षांपसून माझे कार्यकर्ते माझ्या चांगल्या, वाईट काळात माझ्यासोबत असतात. त्यांच्यावर मी अन्याय करणार नाही. माझ्या इंदापूरच्या जनतेने मला कायम साथ दिली आहे. त्यांच्या भावनेचा आदर करत मी जनतेच्या पाठीशी उभा राहणार आहे. आता या चर्चेतून तुमचं म्हणणं जे असेल त्यानंतर जो काही मी निर्णय घेईल तो माझा वयक्तिक निर्णय असणार आहे. असं मी फडणीवसांना सांगितलं.’
दरम्यान, हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले की, या चर्चेनंतर देवेंद्र फडणवीसांनी देखील त्यावर उत्तर देत म्हंटल कि, ‘ठीक आहे तुम्हाला जो योग्य निर्णय वाटेल तो तुम्ही घ्यावा’. हर्षवर्धन पाटील पक्ष प्रवेशानंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी चांगलीच मजबूत होणार असल्याचं दिसत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत इंदापूर मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत पहायला मिळू शकते.
महत्वाच्या बातम्या-
-हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशाच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या,
-‘राम कृष्ण हरी’ म्हणत पाटील वाजवणार ‘तुतारी’; पत्रकार परिषद घेत जाहीर केला निर्णय
-हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारी? पवारांचे निष्ठावंत दुखावले, मानेंची आक्रमक भूमिका
-अंकिता पाटील कापणार भाजपचे दोर; आजच देणार पदाचा राजीनामा
-पुण्यात महिला असुरक्षितच; मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुणीसोबत….