पुणे : पुण्यातील सर्वात जास्त वर्दळ असणाऱ्या स्वारगेट बस स्थानकातील एका शिवाशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने संपूर्ण पुण्यासह राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. ज्या शिवशाही बसमध्ये हा घृणास्पद प्रकार घडला त्या बसचे धक्कादायक वास्तव समोर आले. या प्रकरणी घटनास्थळी अनेक राजकीय नेत्यांनी पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला. आता पुण्याचे पालकमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सोशल मीडिया पोस्ट केली आहे.
‘पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात आपल्या एका भगिनीवर झालेल्या बलात्काराची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक, सुसंस्कृत समाजातील सर्वांना संताप आणणारी, शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. या गुन्ह्यातील आरोपीने केलेला गुन्हा अक्षम्य असून त्याला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही. मी स्वतः पुणे पोलीस आयुक्तांना यासंदर्भात व्यक्तिशः लक्ष घालून तपास करण्याचे, आरोपीला तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले आहेत’, असे अजित पवार म्हणाले आहेत.
स्वारगेट बस स्थानकातील घटना क्लेशदायक, संतापदायक, शरमेने मान खाली घालायला लावणारी
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात आपल्या एका भगिनीवर झालेल्या बलात्काराची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक, सुसंस्कृत समाजातील सर्वांना संताप आणणारी, शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. या…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) February 26, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हा गुन्हा गांभीर्याने घेतला असून पोलिसांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. पोलिसांकडून आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल आणि त्याला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा होईल, यासाठी राज्य शासन सर्व पावले उचलेल, हा विश्वास महाराष्ट्रातील माझ्या तमाम बंधू-भगिनी, मातांना देतो. पीडित बहिणीला न्याय, मानसिक आधार, सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना महिला व बाल विकासमंत्री तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष यांना देण्यात आल्या असल्याचंही अजित पवारांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘हे आपल्या व्यवस्थेला शोभणारं आहे का?’ शरद पवारांच्या आमदाराचा संतप्त सवाल
-फलकमुक्त कसब्याकडे वाटचाल; अनधिकृत फ्लेक्स हटवून आमदार रासनेंनी केली निश्चयाची अंमलबजावणी
-स्वारगेट बसस्थानकातील शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार; राज्य परिवहन मंत्री मिसाळ काय म्हणाल्या?
-स्वारगेट अत्याचार प्रकरण: फरार आरोपीचा फोटो व्हायरल, भावाला घेतलं ताब्यात