पुणे : अनेकजण वाढदिवस साजरे करताना आपण अनेकदा पाहिलं आहे. त्यामध्ये मोठमोठ्या ठिकाणी जाऊन अनेकजण आपला वाढदिवस साजरा करतात. पुण्यातील भोरमधील १११ वर्षांच्या आजोबांचा वाढदिवस देखील असाच जल्लोषात साजरा करण्यात आला आहे. भोर तालुक्यातील हिर्डोशी खोऱ्यातील वारवंड ग्रामस्थांनी एक अनोख्या कार्यक्रमाचे नियोजन करुन गावातील आजोबांचा १११ वा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
मारुती गणू दिघे (रा.वारवड) असे १११ वर्षीय आजोबांचे नाव आहे. भोर महाड रोडवर 30 किमी अंतरावर फाट्यापासून दिड किलोमीटर उंच डोंगरावर ३०० लोकसंख्या असलेले वारवंड गाव आहे. या वाढदिवसानिमित्त ग्रामस्थानी मांडव घातला होता. १११ दिवे लावून, फुलांची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. आजोबांनी त्यांच्या १०० वर्षीय पत्नी लक्ष्मीबाई यांच्यासोबत केक कापून आनंद व्यक्त केला. यावेळी ग्रामस्थांनी घोंगडी, फेटा, पोशाख देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. याचबरोबर गावातील असणाऱ्या वृद्धांचाही सत्कार करण्यात आला.
या आजोबांचा वाढदिवसाचा सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतून नागरीकांनी उपस्थिती दाखवून शुभेच्छा दिल्या. आलेल्या सर्व उपस्थितांना शाकाहारी मांसाहारी जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली होती. हिरडस मावळात पहिल्यांच असा वाढदिवस साजरा केल्याने या वाढदिवसाची चांगलीच चर्चा रंगली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-आयफोन प्रेमींसाठी खुशखबर! आयफोनच्या ‘या’ मॉडेलवर मिळतेय 22 हजार रुपयांची सूट
-आधी धंगेकर आता भाजप अन् राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, पोलीस ठाण्याबाहेरील राडा भोवणार
-हजारो कोटींच्या बेटिंग अॅपच पुणे कनेक्शन, ४५ लॅपटॉप, ८९ मोबाइल अन् ४५२ बँक पासबुक; नेमका विषय काय?
-पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, पाणीकपातीचं संकट टळलं? वाचा काय झाला बैठकीत निर्णय
-पुण्यात राज्य शुल्क विभागाची मोठी कारवाई; शहरात बनावट दारुसह इतक्या लाखांचा मुद्देमाल जप्त