पुणे : पुणे शहरात गुइलिन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) आजाराच्या रुग्णसंख्येने शंभरी पार केली असून झपाट्याने रुग्णसंख्येत होणाऱ्या वाढीने पुणेकरांचं टेंशन वाढत आहे. या आजारामुळे धायरीतील एका रुग्णाचा सोलापूरमध्ये मृत्यू झाला आहे. आता पालिका प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना न केल्याने शहरात रुग्णसंख्या वाढत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे राज्य सरकारनंतर आता केंद्र सरकारही अलर्ट झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत माजी आयुक्तांवर या आजाराबाबतचा सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
आता केंद्र सरकारने सोमवारी ७ जणांच्या तज्ज्ञांचे पथक राज्यात तैनात केले आहे. हे पथक वाढत्या रुग्णसंख्येचे निरीक्षण आणि व्यवस्थापन करण्यासाठी राज्य सरकारला मदत करणार आहे. सध्या पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या रविवारी १११ वर पोहोचली असून, त्यात ६८ पुरुष आणि ३३ महिलांचा समावेश आहे. यापैकी १७ रुग्णांवर व्हेंटिलेटरवरती उपचार सुरू आहेत. केंद्र सरकारने तज्ञांचे पथक तैनात केले असून हे पथक वाढत्या रुग्णसंख्येचे निरीक्षण आणि व्यवस्थापन करण्यासाठी राज्य सरकारला मदत करणार आहे.
दरम्यान, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी जीबीएस रुग्णांची संख्या ज्या भागात जास्त आहेत त्या परिसरात या आजारामागची कारणे शोधण्यासह पाणी पुरवठा करणाऱ्या खासगी तसेच शासकीय टँकरमधील पाण्याची तपासणी करणे, घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे, लक्षणे आढळलेल्या व्यक्तींना तत्काळ रुग्णालयात दाखल होण्यासाठी आवाहन करणे तसेच जनजागृती करण्यासह इतर उपाययोजना कराव्यात असे निर्देश दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-अजितदादांच्या विश्वासू नेत्याची मुजोरी; अद्याप अटक नाही, अजित पवार म्हणाले…
-पुण्यात १ रुपयात ड्रेसची ऑफर महागात; महिलांनी लावली रांगच राग, दुकानदार गायब