पुणे : पुण्यात वाघोली परिसरामध्ये बीएमडब्ल्यू कारने जात असताना, एका तरुणाने येरवड्यातील शास्त्रीनगर चौकात रस्त्याच्या मधोमध गाडी थांबवली, त्यानंतर रस्त्याच्या कडेला लघुशंका केली. स्थानिकांनी हटकल्यावर त्याने अश्लील चाळे केले. हा व्हिडीओ शनिवार ९ मार्च रोजी व्हायरल झाला होता. त्यानंतर शहरात संतापाची लाट उसळली होती. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कारवाई करत गौरव आहुदा आणि त्याच्या मित्राला अटक केली. आता, १७ दिवसांनी गौरव आहुजाला न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.
भररस्त्यात लघुशंका करत अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजानेला अखेर जामीन मंजूर झाला असून आता गौरव आहुजा तुरुंगातून बाहेर येऊ शकतो. ७ मार्च रोजी गौरव आहुजाने भररस्त्यात लघुशंका करण्याचे कृत्य केले होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या गौरव आहुजाला पुणे सत्र न्यायालयाकडून अटी व शर्तीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
येरवड्यातील चौकामध्ये लघुशंका केल्याप्रकरणी गौरव मनोज आहुजा (२५, रा. एनआयबीएम रस्ता, कोंढवा) व त्याचा मित्र भाग्येश प्रकाश ओसवाल (२५, रा. मार्केट यार्ड) या दोघांविरोधात सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. ओसवाल याला शनिवारी रात्री अटक केली. गौरव आणि त्याचा मित्र भाग्येश यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर, त्याला न्यायालयीन कोठडीही सुनावण्यात आली होती. अश्लील चाळे केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गौरव मनोज आहुजाने माफी मागत ८ तासात पोलिसांसमोर हजर होणार असल्याचा देखील व्हिडीओ शेअर केला होता.
महत्वाच्या बातम्या-
-ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणला अन् पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला
-छत्रपती शिवरायांकडे खरंच वाघ्या नावाचा कुत्रा होता का? संभाजीराजेंनी दाखवले ‘ते’ फोटो
-विधानसभेच्या उपाध्यक्षपदी आण्णा बनसोडेंची बिनविरोध निवड; उद्या होणार घोषणा