पुणे : सध्या पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे यांच्या टोळीने पुन्हा एकदा शहरात धूमाकूळ घातला. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या माणसाला भाजप कार्यकर्त्याला पट्ट्याने मारहाण केल्यानंतर पुण्यातील प्रसिद्ध मारणे टोळीविरोधात पोलिसांनी कारवाई करण्यास सुरवात केली. मारणे टोळीचा म्होरक्या गजा मारणे उर्फ गजानान मारणे याच्यावर पोलिसांनी कारवाई केली अन् मारहाण प्रकरणात अटक केली. गजा मारणेवर पोलिसांनी मकोका देखील लावला आहे. पुण्यात आपल्या नावाची इतकी दहशत माजवणारा कुख्यात गुंड गजा मारणे नेमका आहे तरी कोण? गुन्हेगारीत एन्ट्री कशी झाली? गजा मारणेवर किती गुन्हे दाखल आहेत?
पुण्याच्या शहरातील मारणे गँगचा म्होरक्या गजा उर्फ गजानन मारणे हा मूळचा मुळशीतील एका छोट्या गावातील राहणारा होता. काही वर्षांपूर्वी कोथरुडमधील शास्त्रीनगरमध्ये त्याच्या कुटुंंबासह राहण्यासाठी आले होते. कोथरुडमध्ये आल्यानंतर गजा मारणे हा गुन्हेगारीकडे वळाला. गुन्हेगारीत पाऊल टाकताना त्याने पतीत पावन संघटनेचे जुने कार्यकर्ते असलेल्या आणि पुणे शहरात मोठी हस्ती असणाऱ्या मिलिंद ढोले यांची हत्या केली. या हत्येनंतर गजा मारणेने शहरातील डेक्कन, कोथरुड, सासवड, दत्तवाडी आणि पौड भागात आपली दहशत पसरवली.
१९९८ साली गजा मारणेवर मारहाणीचा पहिला गुन्हा डेक्कन ठाण्यात दाखल झाला होता. त्यानंतर १९९० मध्ये डेक्कन पोलीस ठाण्यात मारामारीचे २ तर समर्थ पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर गजा मारणेला २ वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. तरी देखील ३ ते ४ वर्ष गजा मारणेची चर्चा कायम राहिली.
राजकीय वरदहस्त असणाऱ्या एका व्यक्तीच्या डोक्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. १९९६ मध्ये कोथरुड पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर २००६ मध्ये सारसबाग परिसरातील एका हेल्थ क्लबमध्ये देखील या हत्येतील आरोपी कावेडिया आला असताना त्याच्यावर फिल्डींग लावून हत्या केली. अशा हत्येच्या घटनांमुळे गजा मारणेचं गुन्हेगारीत नाव मोठं झालं आणि दहशत आणखी वाढली. मिलिंद ढोले आणि बबलू कावेडिया या दोन्ही खूनाच्या प्रकरणी गजा मारणेची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
या दोन्ही खून प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर गजा मारणेचा एकेकाळचा जिवलग मित्र निलेश घायवळ या दोघांमध्ये गुन्हेगारीत वर्चस्वाची लढाई सुरु झाली. अन् सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुणे शहरात टोळी युद्धाने जन्म घेतला. पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असताना गजा मारणेचं नाव मोठं होतं होतं. त्यामुळे पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या अन् २०१२ मध्ये पुन्हा एक वर्षासाठी गजा मारणेवर तडीपाराची कारवाई झाली.
कुख्यात गुंड गजा मारणे यांच्या घरी राजकीय नेत्यांची उठबस देखील पहायला मिळते. राजकीय नेत्यांसोबत उठबस असणाऱ्या गुंड गजावर आतपर्यंत डेक्कन, कोथरुड, सासवड, दत्तवाडी, पौड, कामोठा, शिरगाव, हिंजवडी, भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, अशा विविध पोलीस ठाण्यांमध्ये २८ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये खून आणि खुनाचा प्रयत्न, गर्दीत मारामारी, खंडणी मागण्याचे गुन्हे दाखल आहेत. गजा मारणेला आता मारहाण प्रकरणी अटक झाली खरी पण सर्वसामान्यांना या टोळी युद्धाचा तसेच या गुंडांच्या दहशतीचा त्रास कधीपर्यंत सहन करावा लागणार यावर कायमची कोणती भूमिका घेणार का? असे प्रश्न सर्वसामान्यांना पडले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-“स्थायी समिती सदस्य होण्यासाठी माझ्याकडे राऊतांनी २५ लाखांची मागणी” शिंदेसेनेचा गंभीर आरोप
-स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी कधी?
-धनुष्यबाण हाती घेण्याआधी धंगेकरांना ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ची ऑफर!
-राजाराम पुलावरील उड्डाणपूलाला ‘नरवीर तानाजी मालुसरे’ नाव देण्याची मागणी