पुणे : पुणे शहरामध्ये २०१९ मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबिल ओढ्याला मोठा पूर आला होता. यामुळे अनेक सोसायट्यांमध्ये पाणी घुसले होते. तसेच सोसायट्यांट्या सीमा भिंती पडून नुकसान झाले. नाल्यांना येणारा पूर रोखण्यासाठी सीमा भिंत बांधणे आवश्यक असल्याने महापालिकेने काही ठिकाणी भिंत, पूल बांधले पण, इतर भागात तांत्रिक कारणामुळे काम करता आले नाही. राज्य सरकारने शहरातील नाल्यांना सीमा भिंत बांधण्यासाठी महापालिका प्रशासनाला २०० कोटी रुपये दिले आहेत.
राज्य सरकारने दिलेल्या या निधीतून संपूर्ण शहराचा विचार न करता केवळ भाजपचे आमदार असलेल्या फक्त ५ विधानसभा मतदारसंघांत हा निधी वाटला गेला आहे. ज्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आमदार आहेत त्या मतदारसंघात एक रुपयाही निधी देण्यात आला नाही.
महापालिका प्रशासनाने भाजपचे आमदार असलेल्या आमदारांच्याच मतदारसंघातील यादी राज्य सरकारकडून मंजूर करून आणली आहे. यामध्ये खडकवासला मतदारसंघासाठी ४१.२३ कोटी, शिवाजीनगर मतदारसंघासाठी २४.८० कोटी, कॅन्टोन्मेंटसाठी ३९.०४ कोटी, पर्वतीसाठी ४१.१५ कोटी आणि कोथरूडसाठी १९.९० कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे.
मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असलेल्या वडगाव शेरी, हडपसर आणि काँग्रेसचे आमदार असलेल्या कसबा मतदारसंघासाठी १ रुपयाही निधी उपलब्ध झाला नसल्याचे समोर आले आहे. परिणामी या भागात नाल्यांना सीमा भिंत बांधण्यात येणार नाही. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही आमदार सत्ताधारी महायुतीमध्ये असूनही त्यांना डावलण्यात आल्याचंही समोर आलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात होणार सर्वात मोठे रुद्रपूजन; पुणेकरांनी सपत्नीक सहभागी होण्याचे चंद्रकांत पाटलांचे आवाहन
-विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाची तयारी पूर्ण; जाहीर केली अंतिम मतदार यादी
-जटोली शिवमंदिरात विराजमान होणार श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पा, आकर्षक विद्युत रोषणाई वाढवणार सौंदर्य