पुणे : पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेवारी वाढत चालली आहे. दररोज खून, बलात्कार, चोरी, दहशतवादी टोळ्या, अमली पदार्थांची खरेदी- विक्री असे अनेक प्रकार घडत असतात. अशातच आता एलआयसी पॉलीसीच्या नावाखाली ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्या आणि विविध फसव्या स्किममध्ये नागरिकांची फसवणूक करणा-या फ्रॉड कॉल सेंटरचा शिवाजीनगर पोलीस स्टेशनकडील सायबर पथकाकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपींवर भादवी कलम ४२०, ४०६ या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी आधीचे ‘फ्यूचर इन लाईफ’ आत्ताचे ‘फ्युचर ग्लोबल सर्विस’ नावाने वेळोवेळी फ्रॉड कॉल सेंटर चालविणारे मुख्य सुत्रधार आरोपी शंकर कारकुन पोखरकर (वय ४२, रा. कात्रज, पुणे), मेहफुज मेहबुब सिध्दकी/शेख, (वय ४०, रा. आँध, पुणे), अशिष रामदास मानकर, (वय ४८, वाघोली, पुणे) यांना अटक करण्यात आलेली आहे.
दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपीने एल. आय. सी कंपनीमधून बोलत आहे. आमच्या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास ज्येष्ठ नागरिकांना चांगला फायदा होईल, असे सांगितले फिर्यादीचा विश्वास संपादन करत फसवणूक झाल्याने सदर बाबत गुन्हा दाखल झाला होता. आरोपी हे फिर्यादी यांना वारंवर फोन करून तसेच फिर्यादीच्या घरी जावून एल.आय.सी.चे स्किम सांगून फिर्यादीची एकूण ५ लाख ४ हजार १६७ रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही फसवणूक ही २०२१ पासून सरू होती. त्यानंतर २०२२ मध्ये फिर्यादीने खात्री करण्यासाठी फोन लावले असता आरोपीचे फोन बंद असायचा. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले म्हणून फिर्यादीने शिवाजीनगर पालीस ठाण्यात येथे तक्रार दिली आहे.
पोलिसांना टाकलेल्या छाप्यामध्ये आरोपींकडे विविध कंपन्याचे १५० सिम कार्ड, ३० विविध बँकेचे बैंक खाती आणि चेक बुक, विविध कंपन्याचे १५ मोबाईल संच, २१ डाटा रजिस्टर, १२ एटीएम कार्ड, ०५ पॅन कार्ड, ०२ संगणक, ३५ विविध कंपन्यांचे नावाचे बनावट शिक्के असे मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहेत. सदर जप्त पंचनाम्यामध्ये एनबीएफसी, इन्फ्रा बँन्ड, सुहाना कन्स्ट्रक्शन अन्ड फायनान्स, एम एस एंटरप्रायजेस, गायत्री डेवलपर्स अन्ड कन्स्ट्रक्शन, एबी कन्स्ट्रक्शन अॅन्ड, शिंदे एंटरप्रायजेस, फ्यूचर इन्वेस्टमेंट सर्विसेस, एची डीगोळे अॅन्ड असोसीएट चार्टर अकाऊंट, फ्युचर फिन्संर प्रायव्हेट लि., फ्युचर लाईफ निधी लि., शिवसाई एर्टरप्रायजेस, लोकमान्य चारीटेबल ट्रस्ट, शिवाजी व एसएस टुरस अन्ड ट्रॅव्हल्स, फ्युचर ग्लोबर सर्विसेस, असे विविध नावे व कंपन्यांचे रबरी शिक्के मिळाले आहेत.
तसेच आरोपीकडे त्यांची एनबीएफसी व एलआयसीचे नावाने तयार केलेले ओळखपत्रे मिळाली आहेत. आरोपी हे स्वतःची ओळख लपवून वेळोवेळी ऑफिस आणि राहण्याचे ठिकाण बदलत होते. शिवाजीनगर सायबर तपास पथकामधील पोलीस अंमलदार आदेश चलवादी आणि तेजस चोपडे यांनी गुन्हयातील अनोळखी ओरोपींचा अतिशय चिकाटीने मागोवा काढत यशस्वीरित्या फ्रॉड कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे.
सदर कामगिरी पोलीस आयुक्त, अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त, रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त सो, पश्चिम प्रादेशिक विभाग, प्रविण पाटील, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-१, संदिपसिंह गिल्ल, सहा पोलीस आयुक्त, साईनाथ ठोंबरे, विश्रामबाग विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे), चंद्रकांत सुर्यवंशी, सहा पोलीस निरीक्षक के बी डाबेराव, पोलीस अंमलदार नलिनी क्षिरसागर, आदेश चलवादी, तेजस चोपडे, गणेश जाधवर, रुचिका जमदाडे, स्वालेहा शेख, सरस्वती कांगणे यांनी केली आहे. वरीष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजीनगर पोलीस स्टेशनकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, अशा प्रकारची कोणतीही फसवणूक झाल्यास नागरिकांनी त्यांच्या हद्दीमधील जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधावा.
महत्वाच्या बातम्या-
-मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची महत्वाची बैठक; फडणवीस, शिंदे अन् अजितदादांची नवा प्लान!
-Budget 2025: आता १२ लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त; केंद्रीय अर्थसंकल्पातून सामान्यांसाठी काय?
-केंद्रीय अर्थसंकल्पात मोदी सरकारने शेतकऱ्यासाठी काय घोषणा केल्या?
-पीएनजी ज्वेलर्सतर्फे दगडूशेठ गणपती चरणी १ किलोचा ‘कमळ हार’ अर्पण