पुणे : पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी)कडून चौकशी करण्यात आली. या चौकशीमध्ये तब्बल ३०० कोटींची संपत्ती उघड झाली असल्याचा दावा केला जात आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अमिताभ गुप्ता यांच्या संपत्ती बाबत गुप्त चौकशी पूर्ण केली असून आता उघड चौकशीसाठी परवानगी मागण्यात आल्याचे समोर आले आहे. अशाप्रकारे उच्चपदस्थ आयपीएस अधिकाऱ्याची चौकशी होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले आहे.
माहिती अधिकारी सुधीर आल्हाट यांच्या तक्रार आणि आरोपांनंतर एसीबीकडून चौकशी करण्यात आली होती. पहिल्यांदा केलेल्या चौकशीत अनेक तथ्य आढळल्यानंतर आता उघड चौकशीची मागणी करण्यात येत आहे. उघड चौकशीची मागणी मान्य झाल्यास अमिताभ गुप्ता यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
पुणे पोलीस आयुक्त पदावर कार्यरत असताना गुप्ता यांनी तब्बल ८०० ते १००० शस्त्र परवाने वाटले आहेत. तसेच या परवान्यांसाठी १५ ते २० लाख रुपये घेतले असल्याचा धक्कादायक आरोप आल्हाट यांनी केला असून या संपूर्ण प्रकाराची चौकशी होणे गरजेचे आहे. यासाठी उघड चौकशी होणं आवश्यक आहे आणि उघड चौकशीसाठी ६ महिने उलटूनही अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे ही परवानगी लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी आल्हाट यांनी केली आहे.
पुण्यातील अॅमनोरा टॉवरमध्ये अमिताभ गुप्ता यांचा आलिशान व्हिला आणि मुंबईतील सांताक्रुझमध्येही गुप्ता यांचा पंचतारांकित फ्लॅट असल्याची माहिती प्राथमिक चौकशीतून समोर आली आहे. मुंबईत तब्बल २२ कोटींचा फ्लॅट गुप्ता यांच्या नावे असल्याचे आल्हाट यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे. तसेच इतर राज्यातील देखील मोठ्या प्रमाणात जमीन आणि संपत्ती खरेदी गुप्ता यांनी केली आहे, असेही सुधीर आल्हाट म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘लाडक्या बहिणीं’ना भरली धास्ती! निकषात न बसणाऱ्यांवर महिला योजनेचा लाभ नको म्हणून करु लागल्या अर्ज
-औंधमधील ‘त्या’ मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय; थायलंडसह महाराष्ट्रातील ९ तरुणी पोलिसांच्या ताब्यात
-Pune GBS: पुणेकरांना दिलासा! ससून रुग्णालयातून ‘जीबीएस’च्या पाच रुग्णांचा डिस्चार्ज
-एलआयसी पॉलीसीच्या नावाखाली फ्रॉड, पण पुणे पोलिसांनी शेवटी ‘त्या’ टोळीला बेड्या ठोकल्याच