पुणे : काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये चांगलंच यश मिळवलं होतं. विधानसभा निवडणुकीतही असाच विजय मिळवू हा कॉन्फिडन्स काँग्रेसने ठेवला होता. मात्र, काँग्रेसला हाच ओव्हर कॉन्फिडन्स नडला अन् विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं. अशातच काँग्रेसमध्ये बदल होणार हे निश्चत असल्यामुळे प्रदेशाध्यक्ष पदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यभरात काँग्रेसच्या संघटनात्मक बदलाच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यभर दौरे करत प्रत्येक जिल्ह्यासाठी १ निरीक्षक नेमला. जिल्ह्यात काँग्रेसची परिस्थिती जाणून घेण्यासाठी पुढील १५ दिवसात या निरीक्षकांनी पक्षाला सोपवायच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये हे निरीक्षक ब्लॉक अध्यक्ष, जिल्ह्याचे नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत. काँग्रेसमध्ये शहर आणि जिल्ह्यामध्ये संघटनेची ताकद, गटबाजी, निवडणूक जिंकण्याची क्षमता या सगळ्यावर हा अहवाल असणार आहे. या अहवालानंतर राज्यभरात मंडल, शहर, जिल्हा आणि राज्य असे संघटनात्मक बदल करण्यात येणार आहेत.
काँग्रेसने पुण्यातील ४ शिलेदारांवर मोठी जबाबदारी सोपवत पुन्हा एकदा जुन्या विश्वासून सहकाऱ्यांवर विश्वास दाखवल्याचे पहायला मिळत आहे. राज्यभर काँग्रेसकडून केल्या जाणाऱ्या बदलामध्ये पुण्यातील प्रमुख ४ शिलेदारांवर हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठी जबाबदारी सोपवली आहे.
कोणत्या प्रमुख शिलेदारांकडे सोपवली जबाबदारी?
लातूर जिल्ह्याची जबाबदारी ही अभय छाजेड, सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी ही मोहन जोशी, कोल्हापूरची जबाबदारी संजय बालगुडे आणि परभणी जिल्ह्याची जबाबदारी ही रमेश बागवे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या पुणे जिल्ह्याची जबाबदारी ही सतेज पाटील यांच्यावर सोपवल्याची माहिती आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर येत्या काही काळात काँग्रेसमध्ये मोठे बदल होणार आहेत हे आता निश्चित झाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-दर अमावस्थेला नारळ दही-भात, अंडी ठेवत जादूटोणा करायची; महिलेचा व्हिडीओ व्हायरल
-पुण्यातील डॉक्टरचा प्रताप; पहिलं लग्न लपवलं दुसरंही केलं अन्…
-पुण्यातील बड्या नेत्याच्या घराबाहेर जादूटोणा, नेमका प्रकार काय?
-रमाजान ईदनिमित्त शहरातील ‘या’ भागातील वाहतूकीत बदल
-मुंडेंनी मुलांचा स्विकार केला पत्नीचा का नाही?, तृप्ती देसाईंचा आक्रमक सवाल