पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोध आंदोलन काही थांबताना दिसत नाही. रुग्णालायमध्ये एका गर्भवती महिलेला वेळेत उपचार दिले नाहीत म्हणून त्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. रुग्णाच्या नातेवाईकांनी आरोप केल्यानंतर रुग्णालयाविरोधात आक्रमक प्रतिक्रिया उमटू लागल्या. काल दिवसभर रुग्णालयाविरोधात आक्रमक आंदोलने करण्यात आली. विविध राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटनांकडून या रुग्णालयाच्या बाहेर निदर्शने करण्यात आली. आक्रमक आंदोलकांकडून चिल्लर फेक करण्यात आली. तसेच पतीत पावन संघटनेने रुग्णालयाच्या बोर्डावर काळं फासलं. तसेच काँग्रेसकडून शाईफेक करण्यात आली. आता आजही ज्येष्ठ नेते शरद पवार गटाकडून चिल्लर फेक करण्यात आली. तसेच लहुजी शक्ती संघटनेचं रुग्णालयाच्या गच्चीवर चढून आंदोलन सुरु आहे.
लहुजी शक्ती सेनेचे आंदोलक आता दीनानाथ रुग्णालयाच्या बाहेर ठिय्या मांडून बसले आहेत. दीनानाथ रुग्णालयाच्या गच्चीवर दोघांनी आंदोलन केलं आहे. पोलिसांकडून या आंदोलकांना वारंवार खाली येण्याचे आवाहन केलं जातं असून या दोघांना खाली उतरवण्यासाठी अग्निशमन दल आणि पोलीस सुद्धा दाखल झालेले आहेत. या आंदोलकांचं म्हणणं एवढंच आहे की जे डॉक्टर केळकर आहे त्यांनी बाहेर येऊन त्यांचा निवेदन स्वीकारावे, अशी या आंदोलकांची मागणी आहे. पोलिसांकडून या आंदोलकांना शांत होण्याचे आवाहन केले जाते आहे.
जोपर्यंत डॉक्टर बाहेर येऊन आमचं निवेदन स्विकारत नाहीत, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, असा आक्रमक पवित्रा या आंदोलकांनी घेतला आहे. आंदोलक महिला हातात शेण घेऊन आल्या आहेत. तसेच हातातील बांगड्या रुग्णालयाबाहेर घेऊन उभ्या आहेत. डॉ. केळकरांवर अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा, अशी देखील मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. पोलिसांकडून आंदोलकांची समजूत काढण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-रुग्णांकडून लाखोंचे बिल घेणाऱ्या दीनानाथ हॉस्पिटलने थकवली कोट्यवधीचा कर, नेमका आकडा किती?
-‘डॉक्टरांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा’, म्हणत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चिल्लर फेक
-निष्पाप जीव गेल्यानंतर दीनानाथ हॉस्पिटलला उपरती, रुग्णांसाठी घेतला मोठा निर्णय
-‘मी पण माझी पोरगी गमावली, आंदोलन करुन बसले काहीही झालं नाही’; रुग्णालयाबाहेर आईची प्रतिक्रिया