पुणे : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असतानाच सायबर क्राईमदेखील वाढत चालला आहे. सायबर क्राईममध्ये नागिकांच्या बँक खात्यातून पैशांची चोरी करणे, नोकरी, लग्नाचे अमिष दाखवून फसवण्याचे प्रकार अलिकडे वाढताना दिसत आहेत. अशातच आता एक धक्कादायक घडना उघडकीस आली आहे. पुण्यातील एका बहाद्दराने एक नव्हे २ नव्हे तर तब्बल २५ महिलांना लग्नाचे अमिष दाखवून त्यांची फसवणूक केली आहे. विवाह संस्थेच्या संकेतस्थळावरुन पुण्याच्या फिरोज शेख या बहाद्दराने २५ महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले, लग्नाचे अमिष दाखवले आणि लाखो रुपये उकाळल्याचा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आला आहे.
फिरोज शेख (वय ३२, रा. गंगावळण, इंदापूर) असं आरोपीचं नाव आहे. तो पुण्यातील कोंढवा भागात राहत होता. फिरोज शेखने मेट्रोमोनियल साईटवर महिला आणि मुलींची माहिती घेत त्यांच्याशी संपर्क साधत होता. इंदापूर, पुण्यासारख्या ठिकाणच्या अनेक महिलांची त्याने फसवणूक केली. त्यानंतर त्याने कोल्हापूरमधील एका घटस्फोटित तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्या कुटुंबाचा विश्वास संपादन करत आपण इंडस्ट्रीयल कॉन्ट्रॅक्टर असल्याची बतावणी देखील केली.
कोल्हापूरच्या या तरुणीसोबत त्याने शारीरिक संबंध देखील ठेवले. तिच्याकडून १ लाख ६९ हजार उकळले. तर ८ लाख २५ हजारांचे दागिने देखील तिच्याकडून घेतले. त्यानंतर लग्नाचा विषय निघाला की त्याने आपल्याला ब्रेन ट्यूमर झाला असल्याचं सांगितलं. संबंधित तरुणीची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित तरुणीने कोल्हापूरातील राजवाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली.
अनेक महिलांवर शारीरिक अत्याचाराबरोबरच पैसे आणि दागिने देखील उकळल्याचे समोर आले आहे. कोल्हापूरातील फसवणूक झालेल्या घटस्फोटीत महिलेच्या तक्रारीनंतर कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने त्याच्यावर कारवाई केली. फिरोज शेख याला ताब्यात घेतल्यानंतर २५ हून अधिक महिलांची फसवणूक केल्याची धक्कादायक कबुली त्याने पोलिसांना दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार? शरद पवारांच्या निकटवर्तीयाचं मोठं वक्तव्य
-RTE ऑनलाईन प्रवेश अर्जाला आजपासून सुरवात; असा भरा अर्ज…
-महायुतीत मिठाचा खडा! तर भाजप अजितदादांच्या पोस्टरला काळं फासणार; बारामतीत नेमकं काय घडलं?
-ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; पुण्यासह ५ शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार