पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मुख्यमंत्री कोट्यातून खोट्या कागदपत्रांच्या आधारे ४ घरे लाटण्याल्या प्रकरणी कोकाटेंना न्यायालयाने २ वर्षांच्या शिक्षा सुनावली आहे. पुढील काही दिवस दिवसांत त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली, त्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्यासह नाशिक जिल्हा बँकेच्या २५ माजी संचालकांना सहकार विभागाने नोटीस बजावली आहे. अशातच आता शरद पवार गटाचे पुण्यातील शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी माणिकराव कोकाटे यांच्याबाबत एक मोठा दावा केला आहे. यामुळे देखील कोकाटेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मंत्र्यांच्या सुरस कहाण्या बाहेर येत आहेत. आता अलिकडच्या काळामध्ये ज्या कृषिमंत्र्यांनी गरिबांचे फ्लॅट हडपण्याचा प्रयत्न केला. कोर्टाने त्यांना शिक्षा दिली. मात्र, वरच्या कोर्टाच्या स्थगितीमुळे आज त्यांच मंत्रिपद टिकलेले आहे. त्यांनी पुन्हा एकदा एक वेगळा प्रकारचा उद्योग केला आहे. कृषी खात्याच्या जमिनीत एकूणच कृषी महाविद्यालयासाठी ज्या जागा रिझर्व आहेत. त्याच्यामध्ये केलेला आहे. पुण्यातील एका वास्तूची नोंद हेरिटेज वास्तू म्हणून आहे. त्या इमारतीतील पहिल्या मजल्यावर या बहाद्दरांनी स्वःताचे कार्यलाय थाटण्याकरिता इमारतीतील मजला तोडण्याचे कामकाज केले आहे, असा दावा प्रशांत जगताप यांनी केला आहे.
देवेंद्रजी फडणवीस… आपल्या मंत्र्यांचे प्रताप थांबवा !
गरिबांचे फ्लॅट्स हडपूनही मंत्री पदाला चिकटून असलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा नवीन प्रताप आज उघडकीस आला. या मंत्रिमहोदयांना मुंबईतील मंत्रालयात प्रशस्त दालन आहे, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कृषी खात्याचे कार्यालय… pic.twitter.com/f5SKKJ4Lzn
— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) March 24, 2025
गरिबांचे फ्लॅट्स हडपूनही मंत्री पदाला चिकटून असलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा नवीन प्रताप आज उघडकीस आला. या मंत्रिमहोदयांना मुंबईतील मंत्रालयात प्रशस्त दालन आहे, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कृषी खात्याचे कार्यालय आहे, तरीही या मंत्र्यांची मौज मजेची लालसा काही शमली नाही. म्हणूनच, महात्मा फुले कृषी विद्यापीठाची पुण्यातील हेरिटेज इमारतीत तोडफोड करून नवीन लक्झरी कार्यालय तयार करण्याचा घाट कोकाटे यांनी घातला, असे प्रशांत जगताप म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-Big News : छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर तेलंगणामधून अटक!
-स्वारगेट अत्याचार प्रकरणी महत्वाची अपडेट; एसटी महामंडळानं ‘त्या’ ७ बड्या अधिकाऱ्यांची केली बदली
-पुरुषांचेच व्हिडीओ करत होता शूट; मोबाईल चेक केल्यानंतर धक्कादायक सत्य आलं समोर
-‘…तर कुणाल कामराचा आबरा का डाबरा करणार’ पुण्यात शिवसैनिक आक्रमक
-हिंजवाडी जळीत हत्याकांड: ‘माझ्या नवऱ्याला विनाकारण अडकवलं जातंय’; बस चालकाच्या पत्नीचा दावा