पुणे : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेले वाल्मिक कराड हे आता पुण्यातील सीआयडी कार्यालयात पोलिसांना शरण आले आहेत. पोलिसांना शरण आल्यानंतर वाल्मिक कराड हा ज्या नव्या कोऱ्या स्कॉर्पिओ कारमधून पोलिसांना शरण आली ती कार नेमकी कोणाची? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. वाल्मिक कराडवर सत्तेतील राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्याचा आरोप सामान्य नागरिक आणि विरोधकांकडून करण्यात आला.
वाल्मिक कराड ज्या गाडीतून सीआयडी कार्यालयात आला, त्या गाडीचा क्रमांक हा MH.23.BG.2231 असा आहे. ही गाडी अनिता शिवलिंग मोराळे या व्यक्तीच्या नावे असून शिवलिंग मोराळे ही व्यक्ती बीड जिल्ह्यातील पालीमधील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर, शिवलिंग मोराळे हा मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता असल्याचे देखील समोर येत आहे. मात्र, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
‘मी खंडणीप्रकरणातील गुन्ह्यात आरोपी असून मी अटकपूर्व जामीनासाठी देखील अर्ज करु शकतो. माझ्यावर राजकीय सुडातून हे आरोप केले जात असून संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी माझी मागणी आहे’, असं वाल्मिक कराडचं म्हणणं आहे. कराडच्या शरणागतीनंतर आता काय नवे खुलासे होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-एक सिगारेट करतेय १७ मिनिटांनी आयुष्य कमी, मात्र एक जानेवारीला सिगारेट सोडल्यास…
-Pune News: थर्टी फर्स्टला फुल तर्राट, हॉटेल सोडणार थेट घरात
-Big Breaking: वाल्मिक कराड स्वतःच Video शेअर करत पोलिसांना शरण
-न्यू ईयरसाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांचा तगडा बंदोबस्त; दारु पिऊन गाडी चालवाल्यास….
-पुणे पोलीस म्हणतात 31 डिसेंबरसाठी आम्हीही तयार, CCTV करणार लाईव्ह मॉनिटरिंग अन् मद्यपींवर…