पुणे : पुणे शहरामध्ये देशातील सर्वात मोठे ड्रग्ज रॅकेट उघडकीस आले होते. त्यानंतर शहरात तसेच शहरातील अनेक ठिकाणी ड्रग्ज संदर्भात कारवाया करण्यात आल्या. तरी देखील शहरामध्ये अद्यापही ड्रग्ज तस्करी बंद झाली नाही. शहरामध्ये सर्रासपणे ड्रग्जची विक्री सुरु आहे. एफसी रोडवरील एका नामांकित हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्टीचा व्हिडीओ व्हायरल झाला. या पार्टीमध्ये काही तरुण हॉटेलच्या बाथरुमध्ये ड्रग्जचे सेवन करताना सापडले आहेत.
या प्रकरणानंतर पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक अनिल माने आणि सहायक पोलीस निरिक्षक दिनेश पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणामध्येआतापर्यंत एकूण ८ जणांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारमालकांसह मॅनेजर डीजेवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या ८ जणांना पुणे पोलीस आज न्यायलयामध्ये हजर करणार आहेत. या प्रकरणानंतर पुन्हा एकदा पुण्यातील मध्यरात्री सुरू असलेल्या पब आणि बारचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
गेल्या काही काळामध्ये पुणे शहरात प्रकरणात करण्यात आलेल्या कारवाईमध्ये २१५ आरोपींपैकी १९० पुरुष, १५ महिला, तर १० परदेशी नागरिकांचा समावेश असल्याची धक्कादायक आकडेवारी आता समोर आली आहे. मार्च २०२४ मध्ये पुण्यामध्ये देशातील सर्वात मोठे ड्रग्ज रॅकेट उघडकीस आले. ३ हजार ६७४ कोटींचे मेफेड्रोन पुणे पोलिसांनी कुरकुंभ कारखान्यातून जप्त केले. हे प्रकरण आंतरराष्ट्रीय पातळीवरील ड्रग्ज रॅकेट आलेले ड्रग्ज प्रकरण अद्यापही थंडावले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Pune Drugs Party: ‘त्या’ व्हायरल व्हिडिओ प्रकरणी शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक निलंबित
-पुण्यात ‘नाईट लाईफ’ला बंदी नाहीच; शहरातील ‘त्या’ हॉटेलमध्ये पहाटेपर्यंत मद्य अन् ड्रग्ज पार्टी