पुणे : अनेक डॉक्टरांकडून विनापरवाना औषध विक्री होत असून परराज्यातून येणाऱ्या औषध साठ्याची माहितीच प्रशासनाकडे नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. एका बाजूला फार्मासिस्टच्या उपस्थितीत औषध विक्री झाली नाही, म्हणून सामान्य केमिस्ट्रीवर कारवाई करणारे अन्न व औषध प्रशासन मात्र डॉक्टरांच्या नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांकडून दिल्या जाणाऱ्या औषध विक्रीवर कुठलेच निर्बंध ठेवताना दिसत नाही. हे प्रकार तत्काळ बंद व्हायला हवेत, अशी मागणी पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनने केली आहे.
असोसिएशनकडून अन्न व औषध प्रशासन आयुक्तांना निवेदन देण्यात आले असून डॉक्टरांकडून होत असलेल्या विनापरवाना औषधविक्रीकडे प्रशासन जाणीवपूर्वक डोळे झाक तर करत नाही ना ? अशी शंका उपस्थित केली आहे. औषध विक्री फार्मसिस्टच्या उपस्थित झाली न झाल्यास केमिस्टवर कारवाई होते, परंतु डॉक्टरांच्या येथील नर्स किंवा इतर कर्मचाऱ्या मार्फत झालेल्या औषध विक्रीवर कुठलेच निर्बध नाहीत. तसेच सामान्य केमिस्टला शेड्युल H व H1 चे रजिस्टर अद्यावत ठेवणे बंधनकारक आहे, तसे न केल्यास त्यांच्या परवाना निलंबित अथवा कायमचा रद्द केला जातो. दुसरीकडे डॉक्टरांनी केलेल्या शेड्युल H आथवा H1 अंतर्गत असलेल्या औषधाच्या विक्रीची अथवा त्याच्या रजिस्टरची तपासणी होत नाही. या दुप्पटी धोरणामुळे सामान्य औषध व्यावसायिक निराशेच्या गर्तेत अडकला आहे.
याबद्दल बोलताना पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे सचिव अनिल बेलकर म्हणाले “सामान्य केमिस्टप्रमाणे डॉक्टरांची देखील तपासणी करून शेड्युल H व शेड्युल H1 च्या रजिस्टर बरोबर फार्मसिस्टची उपस्थितीची शहानिशा करावी. या प्रकारे होत असलेल्या औषधविक्रीतून घेतला जाणारा वस्तू व सेवा कर (GST) शासनाला वेळेवर जमा केला जातो अथवा नाही ? याची खात्री करावी.”
महत्वाच्या बातम्या-
-‘बरं झालं पक्ष फुटला, अशा पुरुषासोबत मी काम करु शकत नाही’; सुप्रिया सुळेंच्या भाषणाची क्लिप व्हायरल
-‘महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती’, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आक्रमक
-स्वारगेट बस अत्याचारानंतर अखेर एसटी महामंडळाला आली जाग; ‘त्या’ बसचा होणार भंगारात लिलाव