पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे गेल्या २ दिवसांपासून चांगलेच चर्चेत आले असून रुग्णालयाचा पैशाचा लालचीपण स्पष्ट दिसून आला आहे. रुग्णाला वेळेत उपचार न मिळाल्याने तनिषा भिसे या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करत रुग्णालयाविरोधात निषेध व्यक्त केला जात आहे. सर्वत्र टीका केली जात आहे. अशातच आता या प्रकरणी आरोग्य विभागात झाडाझडतीला सुरूवात झाली असून आरोग्य खात्यातील बड्या अधिकाऱ्याचा पदभार काढून घेतल्याची मोठी अपडेट आता समोर येत आहे.
कुटुंब कल्याण विभागाचा अतिरीक्त पदभार बबिता कमलापुरकर यांच्याकडे होता. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेनंतर कमलापूरकर यांना पदावरुन हटवण्यात आले आहे. त्यानंतर आरोग्य विभागाकडून कारवाईला सुरवात झाल्याची चर्चा आहे. कुटुंब कल्याण विभागाकडे माता मृत्यू रोखण्याची मुख्य जबाबदारी असते त्यामुळे हा विभाग अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. दीनानाथ रुग्णालयामध्ये घडलेल्या प्रकारामुळे आता कुटुंब कल्याण विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉक्टर बबिता कमलापूरकर यांच्याकडील पदभार काढून घेतला आहे.
कमलापूरकर यांच्या जागी आता डॅाक्टर संदीप सांगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कमालापुरकर यांच्याकडे आता फक्त पुण्याचा आरोग्य विभागाच्या सहसंचालक पदाचा कार्यभार देण्यात आला आहे. सांगळे यांच्याकडेही अतिरिक्त पदभार महत्वाच्या पदावर पुर्णवेळ आधिकाऱ्याची नियुक्ती केलेली नाही.
दरम्यान, या प्रकरणी आता सर्व चौकशी सुरु असून हळूहळू एकेक धागेदोरे हाती येत लागत आहेत. रुग्णालयाची होत असलेली बदनामी पाहून दिनानाथ रुग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास यांनी रुग्णालय प्रशासनाची होणारी बदनामी आणि रुग्णांची होणारी गैरसोय या ही कारणे पुढे करत आपला राजीनामा सोमवारी रुग्णालय प्रसासनाकडे सुपूर्द केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘३५ वर्षांपूर्वी ‘दीनानाथ’ला जागा देऊन आम्ही चूक केली का?’ जागेचे मूळ मालक खिलारेंचा उद्विग्न सवाल
-‘रुग्णांकडून कोणतंही डिपॉझिट घेऊ नका’; पालिकेने धाडली सर्व खासगी रुग्णालयांना नोटीस
-अवघ्या ६ महिन्यात वाढले दीड लाख मतदार; पुण्यात ‘या’ भागात सर्वात जास्त मतदार
-‘रुग्णालयाकडून ४८ तासात कर वसूल करा नाही तर मी..’; सुप्रिया सुळेंचा इशारा
-तनिषा भिसे मृत्यू प्रकरण: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. घैसास यांचा राजीनामा