पुणे : पुण्यातील नामांकित रुग्णालयांपैकी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पुणे महानगरपालिकेच्या मिळकत कराची तब्बल २७ कोटींची रक्कम थकवली होती. नुकताच दीनानाथ रुग्णालायचा लालचीपणा समोर आला. गर्भवती महिलेला वेळेत उपचान न मिळाल्याने महिलेचा अतिरक्तस्त्रावाने मृत्यू झाला. त्यानंतर महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयाविरोध तक्रार केली. त्यानंतर रुग्णालयाविरोधात सर्वच पक्षांनी आणि सामाजिक संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर रुग्णालयाची कुंडली काढली गेली.
दीनानाथ रुग्णालयाने गेल्या ६ वर्षात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय व्यवस्थापनाने कराचा एकही रुपया भरला नाही. रुगणालयाने थकवलेला पालिकेचा कर हा थोडका नसून तब्बल २७ कोटी ३८ लाख रुपयांचा असल्याची माहिती आता समोर आली होती. रुग्णालय चालविण्याची जबाबदारी असणाऱ्या लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनने सन २०१४ पासून एकही रुपयांचा कर भरलेला नसल्याचे महापालिकेने सादर केलेल्या अहवालावरुन स्पष्ट झाले. त्यानंतर आता अखेर पुणे महापालिकाने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला मिळकतकर वसुलीसाठी नोटीस पाठवली आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडे २०१४ पासूनची थकबाकी असून लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनच्या नावाने पुणे पालिकेने नोटीस पाठवली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २२ कोटी ६ लाख, ७६ हजार रुपयेची थकबाकी आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार ही थकबाकी भरणे आवशक आहे. येत्या दोन दिवसात २२ कोटीची थकबाकी न भरसल्या पुढील कारवाई केली जाणार असल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कराधान नियम ४२ मध्ये तरतुदीनुसार रुग्णालयावर जप्तीचे कारवाई करण्याचे महापालिकेने तोंडी आदेश दिले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरण: आरोग्य विभागानं ‘या’ बड्या अधिकाऱ्यावर केली मोठी कारवाई
-‘३५ वर्षांपूर्वी ‘दीनानाथ’ला जागा देऊन आम्ही चूक केली का?’ जागेचे मूळ मालक खिलारेंचा उद्विग्न सवाल
-‘रुग्णांकडून कोणतंही डिपॉझिट घेऊ नका’; पालिकेने धाडली सर्व खासगी रुग्णालयांना नोटीस
-अवघ्या ६ महिन्यात वाढले दीड लाख मतदार; पुण्यात ‘या’ भागात सर्वात जास्त मतदार
-‘रुग्णालयाकडून ४८ तासात कर वसूल करा नाही तर मी..’; सुप्रिया सुळेंचा इशारा