पुणे : तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर पुण्याचे नामांकित रुग्णालय दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. रुग्णालयाच्या अडचणी दिवसेंदिवस वाढ होत आहेत. नुकतीच तनिषा भिसे मृत्यू झाल्याची घटना घडली अन् दीनानाथ रुग्णालयाविरोधात आक्रमक आंदोलने सुरु झाली. त्यातच आता दीनानाथ रुग्णालयाने पुणे महानगरपालिकेचा २०१९ पासूनचा प्रॅापर्टी टॅक्स थकवल्याचे समोर आले आहे.
गेल्या ६ वर्षात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय व्यवस्थापनाने कराचा एकही रुपया भरला नाही. रुगणालयाने थकवलेला पालिकेचा कर हा थोडका नसून तब्बल २७ कोटी ३८ लाख रुपयांचा असल्याची माहिती आता समोर आली आहे. रुग्णालय चालविण्याची जबाबदारी असणाऱ्या लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनने सन २०१९ पासून एकही रुपयांचा कर भरलेला नसल्याचे महापालिकेने सादर केलेल्या अहवालावरुन स्पष्ट झाले आहे. धर्मदाय रुग्णालयांना मिळकतकर सवलत असल्याचा दावा केला जात असला, तरी महापालिकेने मात्र लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनकडे २७ कोटींची थकबाकी दाखविली आहे.
आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून रुग्णांना वंचित राहायला लागू नये या करिता शासनातर्फे महात्मा फुले आरोग्य योजना राबवली जाते. मात्र, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ‘महात्मा फुले आरोग्य योजने’चा लाभच मिळत नसल्याची देखील धक्कादायक बाब आता समोर आली आहे. मंगेशकर रुग्णालयाने एका रुग्णाला चक्क पेपरवर लिहून दिले आहे की, ‘महात्मा फुले योजनेचा लाभ येथे मिळत नाही.’ परशुराम हिंदू सेवा संघाने यावरती आक्षेप घेत “सरकारने सर्वसामान्य आणि गोरगरिबांसाठी घोषित केलेल्या योजनेचं काय? असा सवाल उपस्थित केला आहे. रुग्णालयात रुग्णांना महात्मा फुले योजनेचा लाभ मिळत नसल्याने या रुग्णालयाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे परशुराम हिंदू सेवा संघ तक्रार करणार आहे.
त्यामुळे, आता पुणे महापालिका थकवलेला कर पालिका वसूल करणार का? आणि परशूराम हिंदू सेवा संघाने मुख्यमंत्र्यांकडे या रुग्णालयाची महात्मा फुले योजनेसंदर्भात तक्रार केल्यास या रुग्णालयावर कारवाई केली जाणार का?, असे सवाल आता उपस्थित होत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘डॉक्टरांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा’, म्हणत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चिल्लर फेक
-निष्पाप जीव गेल्यानंतर दीनानाथ हॉस्पिटलला उपरती, रुग्णांसाठी घेतला मोठा निर्णय
-‘मी पण माझी पोरगी गमावली, आंदोलन करुन बसले काहीही झालं नाही’; रुग्णालयाबाहेर आईची प्रतिक्रिया
-‘रुग्णालयाच्या ट्रस्टींवर मुनष्यवधाचा गुन्हा दाखल करा’; काँग्रेसकडून रुग्णालयाच्या बोर्डावर शाईफेक