मुंबई : पुणे शहरातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणावरुन विधानसभा सभागृहामध्ये चांगलीच खडाजंगी सुरु आहे. पोर्शे अपघातप्रकरणात पोलिसांपासून ते ससूनमधील डॉक्टरांनी आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाला वाचवण्याचे अनेक प्रयत्न झाल्याने या प्रकरणावरुन पोलीस खाते आणि गृहमंत्रालयावर जोरदार टीका झाली होती. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शुक्रवारी सभागृहात पोर्शे अपघात प्रकरणावर निवेदन दिले.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“हा मुद्दा नक्कीच गंभीर आहे. ही घटना १९ मे २०२४ रोजी रात्री अडीचच्या सुमारास घडली. त्यानंतर अल्पवयीन मुलावर आधी पोलिसांनी जो गुन्हा दाखल केला तो ३०४ अ होता. पण त्यानंतर वरिष्ठांनी भेट दिली आणि त्यांनी सांगितलं की ३०४ अ नव्हे, ३०४ चाच गुन्हा दाखल केला पाहिजे. त्यामुळे त्याच दिवशी केस डायरीमध्ये ३०४ चा गुन्हा दाखल केला”, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे.
“पहिली चूक ही आहे की, जेव्हा त्याला रात्री ३ वाजता पोलीस स्थानकात आणलं तेव्हा त्याला लगेच वैद्यकीय चाचणीसाठी पाठवायला हवं होतं. पण त्यांनी सकाळी साडे आठला पाठवलं. दुसरी, असा गुन्हा घडला की साधारणपणे अपघात प्रकरणात ३०४ अ लावतात. पण त्यावेळी त्यांनी वरीष्ठांना आधी कळवायला हवं होतं. पण ते त्यांनी केलं नाही. वरीष्ठांनी तो ३०४ करायला लावला. त्यामुळे ड्युटी व्यवस्थित केली नाही यासाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केले असल्याचे देवेंद्र फडणवीसांना सभागृहामध्ये सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-लक्ष्मण हाकेंची ‘अभिवादन यात्रा’ स्थगितीवर प्रतिक्रिया; म्हणाले, ‘माझ्या भागामध्ये येऊन…’
-‘अजित पवार गटाच्या २२ आमदारांनी शरद पवारांशी संपर्क साधला, पण…’; रोहित पवारांचा गौप्यस्फोट
-‘…अन् ते ऐकून मी कपाळावर हात मारला’; अजित पवारांनी सुरेश धस यांच्याबाबत असं काय सांगितलं?
-‘हमाल, कष्टकरी माथाडी कायद्याची अंमलबजावणी करा, अन्यथा…’; बाबा आढावांचा राज्य सरकारला इशारा
-पुण्यात पालखी सोहळ्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज; ५ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात