पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाची मंगळवारी दुपार पत्रकार परिषद झाली अन् महाराष्ट्र आणि झारखंड याराज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. राज्यात निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या अन् तेव्हापासून राज्यात आचारसंहिता लागू झाली. पुणे शहरात मात्र आचारसंहितेचा भंग झाल्याचे पहायला मिळत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून शहरातील चौका-चौकात राजकीय नेत्यांचे बॅनर झळकले.
मतदारसंघात आपल्या नावाची चर्चा होण्यासाठी इच्छुक नेत्यांकडून शहरात ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली.या फलकांमुळे महापालिकेचा लाखो रुपयांचा महसूलही बुडत असल्याचे समोर आले आहे. हे बॅनर लावण्यापूर्वी नेत्यांनी पालिकेची कोणतीही परवानगी घेतली नसल्याने पालिकेचे उत्पन्न बुडत आहे. शहरात लावण्यात आलेल्या बेकायदा बॅनरमुळे वाहतूकीचे फलक आणि सिग्नल्सही झाकून गेल्याचे पहायला मिळत आहे.
बेकायदा लावण्यात आलेल्या जाहिरात फलकांवर कारवाई करुन ते तातडीने काढून टाकण्याच आदेश मागील आठवड्यात महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी पालिकेच्या आकाशचिन्ह विभागाला दिले होते. मात्र, या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट दिसत आहे.
दरम्यान, शहरातील राजकीय तसेच इतर बेकायदा जाहिरात बॅनर्स गुरुवारी दुपारपर्यंत काढून टाकले जातील. याबाबतच्या सूचना आकाशचिन्ह विभागाच्या उपायुक्तांना देण्यात आल्या असल्याचे पालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले आहे. आता हे बेकायदा बॅनर्सवर कधी आणि काय कारवाई केली जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-आमदारकी हुकली पण, पुन्हा एकदा महिला आयोगाचं अध्यक्षपद; चाकणकरांना लागली लॉटरी
-Chinchwad: जगताप कुटुंबाला स्वकियांकडूनच विरोध; विरोधी उमेदवार होणार फायदा?
-‘महाविकास आघाडीची २१८ जागांवर एकवाक्यता’ पण हडपसरचं काय? अमोल कोल्हे म्हणाले…
-Assembly Election: विधानसभा बिगुल वाजलं; महाराष्ट्र निवडणुकीच्या तारखा जाहीर, मतदान कधी?