पुणे : श्री. संत ज्ञानेश्वर माऊलांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने आज प्रस्थान होणार आहे. या निमित्त आळंदीमध्ये वारकऱ्यांची मोठी गर्दी झाल्याचे पहायला मिळात आहे. आळंदीमध्ये इंद्रायणीच्या काठी वारकऱ्यांनी मोठी गर्दी करत टाळ, मृदुंगाच्या तालावर ठेका धरला होता. श्री. संत ज्ञानोबा, श्री. संत तुकोबारायांच्या गरजरात वारकरी चांगलेच तल्लीन झाले आहेत.
शुक्रवारी २८ जून रोजी तुकोबारायांच्या पालखीचे प्रस्थान झाले तर आज ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. या दोन्ही पालख्यांचा मुक्काम पुणे शहरात भवानी पेठ आणि कसब्यामध्ये होणार आहे. रविवारी (३० जून) पालखी सोहळा शहरात दाखल होणार आहे. या पालखी सोहळ्यासाठी लाखो वारकरी, भाविकांची मोठी गर्दी होत असते.
या वारकरी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून भाविक आळंदीत दाखल झाले आहेत. इंद्रायणीच्या घाटावर मोठ्या उत्साहच वातावरण पाहायला मिळत आहे. सगळीकडे वारकऱ्यांची लगबग पाहायला मिळत आहे. या सोहळ्याचे निमित्ताने तालुका पंचायत, जिल्हा परिषद आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या वतीने सोयीसुविधांची तयारी पूर्ण झाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-धक्कादायक! पुण्यातील नामांकित हॉस्पिटलने लपवली झिकाचा रुग्णाची माहिती; पालिकेने घेतली मोठी अॅक्शन
-‘जो जे वांच्छिल तो ते लाहो.’; चंद्रकांत पाटलांचा वारकऱ्यांसाठी संकल्प
-पुणे ड्रग्ज् पार्टी: पुणे पोलीसांनी आतापर्यंत ३ ड्रग्ज् पेडलर्सला केली अटक
-अनधिकृत पब्स आणि बारवर पुणे महापालिकेची धडक कारवाई; दिवसभरात तब्बल १३ हॉटेलवर हातोडा
-‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने’वरुन उद्धव ठाकरेंचा टोला; म्हणाले, ‘लेकींची काळजी घेताय पण,…’