पुणे : राज्याच्या राजकारणामध्ये मोठी घडामोड घडली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी त्यांच्या भेटीला गेले होते. यावेळी पवार कुटुंबियांनी शरद पवारांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच अजित पवार, खासदार सुनेत्रा पवार आणि त्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेत्यांनी शरद पवारांची भेट घेत त्यांना शभेच्छा दिल्या आहेत. या भेटीवरुन राज्याच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. या भेटीबाबत बोलताना “मी घरातलाच आहे बाहेरचा नाही. राजकारणात टीका-टिप्पणी होत असते. पण, राजकारणाव्यतिरिक्त काही संबंध असतात” असं सूचक वक्तव्यही अजित पवारांनी केले आहे. यावर आता पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
“पारिवारिक नातं असतं त्यामध्ये मतभेद कधीच नसतात. मला असं वाटते की, दादांनी जी भूमिका घेतली पवार साहेबांना जाऊन भेटून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असून अत्यंत महत्त्वाचं काम अजित पवारांनी केलं आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मग तो पवार साहेबांच्या गटात किंवा दादांच्या गटातील प्रत्येकाला या मेसेजमुळे खूप चांगला वाटलं आहे. प्रत्येकाला असं वाटतंय की, हे दोघे नेते एकत्र आले तर महाराष्ट्राचा राजकारण एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल. एक दादांच्या भूमिकेशी आम्ही सगळेजण सहमत आहोत”, असे दीपक मानकर म्हणाले आहेत.
“या महाराष्ट्राला आदरणीय यशवंतराव चव्हाण यांची परंपरा आहे. यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या जीवन क्रमामध्ये बेरजेचं राजकारण सातत्याने केलं आणि तेच राजकारण दादांच्या माध्यमातून होते असल्याचं लक्षात येतं. कारण त्या पाऊलवाट्याच्या आणण्याचा प्रयत्न अजितदादा नेहमी करत असतात. या पुरोगामी महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देण्याचे काम दादा करतील असं मला विश्वास आहे. राजकीय जीवनामध्ये 25-25 वर्षांचे इतिहास असणारे पक्ष देखील एकमेकांवर कुरघोडी करणारी मंडळी एकत्र आलीत त्यामुळे हे एकत्र आले तर काय मोठे वेगळे काय होईल असं मला नाही वाटत. परंतु होऊ शकतं राजकारणामध्ये काही होऊ शकतं”, असंही दीपक मानकर म्हणाले आहेत. त्यामुळे आता शरद पवार आणि अजित पवार हे काका पुतणे पुन्हा एकत्र येणार का याबाबत चर्चेला उधाण आलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-…अन् पुण्यातील ‘ त्या’ पबवर गृहमंत्री गोपीनाथ मुंडेंनी स्वतः टाकली होती रेड
-महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट
-भटक्या कुत्र्यांनी तब्बल १४ हजार पुणेकरांना घेतला चावा; पालिका प्रशासनावर नागिरकांची तीव्र नाराजी
-‘वेळ पडल्यास स्वबळावर लढणार’; शरद पवारांच्या नेत्याच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
-विधानसभेनंतर लक्ष महापालिकेवर, ८ मतदारसंघात भाजपची सदस्य नोंदणी जोरात