पुणे : देशाच्या विकासात जैन समाजाचे मोठे योगदान आहे व दातृत्वात सदैव अग्रेसर राहिलेला जैन समाज हा परंपरेने महायुती सरकारच्या पाठीशी राहिलेला समाज आहे. ज्या समाजाने महायुतीला नेहमीच भक्कम पाठींबा दिला त्या समाजाच्या हितासाठी नुकताच राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
सरकारने नुकतीच जैन समाजासाठी अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे. हा निर्णय व्हावा यासाठी पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी पाठपुरावा केला होता ज्याला आता यश आले आहे. या निर्णयामुळे जैन समाजामध्ये आनंदाचे वातावरण असून जैन समाजातर्फे आमदार माधुरी मिसाळ यांचा महावीर प्रतिष्ठान सलीसबरी पार्क येथे सत्कार करण्यात आला.
‘सरकारने जैन समाजासाठी अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणार असल्याची घोषणा केली त्याचा आनंद आहे. आम्ही यासाठी पाठपुरावा करत होतो आणि सरकारने आमच्या पाठपुराव्याला यश दिले त्याबद्दल मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार व्यक्त करते. या महामंडळाच्या माध्यमातून जैन समाजासाठीचा फंड गरजू लोकांपर्यंत पोहचेल. या महामंडळाची स्थापना करून सरकाने या समाजाला मोठा आधार दिला आहे. या जनहिताच्या निर्णयाबाबत सरकारचे मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करते’, असे आमदार माधुरी मिसाळ यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘…तर आबा बागुल कधीच मंत्री झाले असते! पण आता आम्ही प्रयत्न करतोय’- थोरात
-काकांचा-पुतण्याला धक्का; ‘हा’ माजी आमदार तुतारी फुंकण्याच्या तयारीत
-सुनील शेळके अजितदादांसमोर भर सभेत म्हणाले, ‘तुम्हाला दादागिरी आणि दहशत करायची असेल, तर…’
-युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; भाजयुमोच्या कार्यकर्त्यांकडून निदर्शने