पुणे : पुणे शहराला नवी ओळख देण्यासाठी तसेच वाचन चववळीच्या सक्षमीकरणासाठी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सव होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी १४ डिसेंबर रोजी, सायंकाळी पाच वाजता होणार आहे. मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर फडणवीसांचा पहिलाच पुणे दौरा असणार आहे त्यामुळे या उद्घाट सोहळ्याला पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी केले आहे.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर येत्या १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत पुणे पुस्तक महोत्सव होत आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनाची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पांडे बोलत होते. यावेळी बोलताना राजेश पांडे म्हणाले की, ‘राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे. देवेंद्र महोत्सवातील पुस्तकांच्या स्टॉलला भेट देऊन, लेखक, साहित्यिक, प्रकाशकांशी संवाद साधणार आहे. या निमित्ताने पुणेकरांना देवेंद्रजींशी संवाद साधण्याची संधी मिळेल.’
‘उद्घाटनाचा मुख्य कार्यक्रम फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या भव्य स्टेजवर होणार आहे. या कार्यक्रमाला कुलगुरू, साहित्यिक, लेखक, कवी, चित्रकार, संपादक, प्राचार्य अशी मंडळी उपस्थित राहणार आहे. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला असल्याने, पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वाचन संस्कृतीला वाढविण्यासाठी हातभार लावावा’, असे आवाहन पांडे यांनी केले. या महोत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यात सुरू असून, उद्घाटनाचा कार्यक्रम हजारो पुणेकरांच्या उपस्थितीत जल्लोषात होणार असल्याचे पांडे यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-सतीश वाघ हत्या प्रकरणी पोलिसांकडून चौघे ताब्यात; धक्कादायक माहिती आली समोर
-बांग्लादेशी रोहिंग्यानं पुण्यात घर घेऊन थाटला संसार; अवघ्या ५०० रुपयांत काढलं खोटं आधारकार्ड
-माय-लेकराच्या नात्याला काळिमा; थंडीच्या कडाक्यात नवजात बाळाला तोंडाला पिशवी बांधून रस्त्यावर फेकलं
-मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना: पिंपरी-चिंचवडमधील लाखो ‘लाडक्या बहिणीं’चे अर्ज बाद