पुणे : राज्यात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यातच महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरुन रस्सीखेच सुरु असून धूसपूस पहायला मिळत आहे. त्यातच आता काँग्रेसमध्ये सुरु असलेला वाद आता चव्हाट्यावर आला आहे. पुणे शहर काँग्रेसमध्ये कसब्याचे विद्यमान आमदार रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यावरुन अंतर्गत वाद सुरु झाला आहे.
पुणे काँग्रेसच्या शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी रवींद्र धंगेकर यांच्या उमेदवारीला विरोध केला असून पक्षाकडे मागणी देखील केली आहे. ‘जे उमेदवार पक्षाचे नेते राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मलिकार्जुन खर्गे यांचे फोटो बॅनर्सवर लावणार नाहीत अशांना उमेदवारी देऊ नका’, असं म्हणत अरविंद शिंदे यांनी अप्रत्यरित्या धंगेकरांच्या उमेदवारीला विरोध केला आहे.
‘व्यक्तिगत राजकारण करणाऱ्यांना पक्ष संधी देणार नाही. कोणी काँग्रेस विचाराशी एकरूप नसेल तर असा कोणी उमेदवार असेल तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी देऊ नये’, अशी मागणी अरविंद शिंदे यांनी पक्षाकडे केली असून ‘शहरात असा कोणी काँग्रेस नेता असेल कोणी पदाधिकारी हे काँग्रेस बैठक किंवा आंदोलनला ५० टक्के उपस्थितीत नसतील. त्यांना उमेदवारी देताना विचार करावा. शेवटी पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील त्या आम्हाला मान्य असेल. विधानसभा निवडणुकीत ८ मतदारसंघात २२ जण इच्छुक आहेत’, असेही अरविंद शिंदे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-वडगाव शेरीत भाजपला गळती? पंकजा मुंडेंच्या बैठकीला माजी आमदारासह नगरसेवकांची दांडी
-वनराज आंदेकर हत्येनंतर पुण्यात टोळीयुद्ध भडकणार?; वडिल सुर्यकांत आंदेकरांनी घेतली शपथ
-पुणे वनराज आंदेकर खून प्रकरण: पोलिसांनी तीघांना घेतलं ताब्यात, खूनाचं कारण काय?
-पुणे हादरले! राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरांवर गोळीबार; प्रकृती गंभीर
-बाप्पा निघाले काश्मीरला! युवा उद्योजक पुनीत बालन आणि मानाच्या गणेश मंडळांचा पुढाकार