पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी दिवसेंददिवस वाढतच आहे. पुणे शहरात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी भाजप आणि महायुतीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते एकवटले आहेत. त्यातच महाविकास आघाडीचे उमदेवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचाराऐवजी काँग्रेसमधील पक्षांतर्गत वादच मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
रविवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि कॉँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी धंगेकर यांच्या प्रचारार्थ कॉँग्रेस भवन येथे आले असताना त्यांच्या समोरच कॉँग्रेसचे माजी गटनेतेआबा बागूल यांच्या विरोधात बॅनर्स झळकावून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. राजकीय वर्तुळात या सर्व प्रकाराची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
पुणे लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले आबा बागूल यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूरला जाऊन भेट घेतली होती. या घटनेनंतर बाळासाहेब थोरात यांनी त्यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता.
‘नाराजांकडे जाणे, त्यांच्याशी बोलणे हे आमचे काम आहे.’ बागूल यांचीही नाराजी दूर होईल अशी अपेक्षा आहे.’ असे बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. मात्र, या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेसचे दोन पदाधिकारी काँग्रेसभवनमध्ये बॅनर्स घेऊन आले. त्यांनी माजी नगरसेवक आबा बागुल यांच्या हकालपट्टीची मागणी करत काँग्रेस भवनाबाहेर पोस्टर झळकवले.
‘नागपूर येथे भाजप नेत्यांची भेट घेऊन येणाऱ्यांचा जाहीर निषेध,’ अशा आशयाचे फलक झळकावले. तसेच, ‘गद्दार बघाओ, काँग्रेस बचाओ’चा नारा देखील देण्यात आला. रवींद्र धंगेकर यांना पुणे लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच पक्षांतर्गत आणि आघाडी अंतर्गत नाराजी चांगलीच दिसून आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-जंगी रॅली अन् नदीपात्रात सभा, गुरुवारी मुरलीधर मोहोळ भरणार उमेदवारी अर्ज
-रविवार पेठेतील भोरी आळीमध्ये दुकानाला आग; सुदैवाने कोणतीही जिवीत हानी नाही
-निवडणुकीनंतर पवार कुटुंब एकत्र येणार?; अजितदादा म्हणाले, “एकदा ७ तारखेला मतदान होऊ द्या, मग…”
-लग्नानंतर पती गे असल्याचं समजलं; तरीही २ वर्षे संसार रेटला, अखेर पीडितेने पोलिसांत घेतली धाव