पुणे : आता राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार असल्याची माहिती मिळत आहे. भोरचे माजी आमदार आणि काँग्रेसचे नेते संग्राम थोपटे हे काँग्रेस हात सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची मोठी अपडेट समोर येत आहे. रविवारी संग्राम थोपटे हे हाती कमळ घेणार असून पश्चिम महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे.
३ टर्म आमदार राहिलेले संग्राम थोपटे हे काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये जाणार असल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे. संग्राम थोपटे हे काँग्रेसचे बडे नेते असून ते ३ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. तर त्यांचे वडील अनंतराव थोपटे हे ६ वेळा भोर विधानसभेचे आमदार राहिले होते. भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने संग्राम थोपटे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भोर विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नवखे उमेदवार शंकर मांडेकर यांनी संग्राम थोपटे यांचा पराभव केला. गेल्या अनेक टर्म थोपटेंकडे राहिलेला मतदारसंघ ऐनवेळी अजित पवारांच्या ताब्यात गेला. शंकर मांडेकर आणि संग्राम थोपटे यांच्या लढतीमध्ये थोपटेंना मांडेकरांना तब्बल २० हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला.
विधानसभा निवडणुकीपूर्वीच थोपटे हे भाजपच्या संपर्कात होते. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच ते काँग्रेसला रामराम करतील अशी दबक्या आवाजात चर्चा सुरु होती. आता येत्या २ दिवसांत रविवारी संग्राम थोपटे हे काँग्रेला रामराम करणार असून २२ एप्रिल रोजी थोपटे हे हाती कमळ घेणार असल्याचं बोललं जात आहे.
महत्वाच्या बातम्या
-पुण्यात दर्गात घुसून राडा; खासदार कुलकर्णींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
-एकही अनधिकृत फ्लेक्स न उभारता साजरा झाला आमदार हेमंत रासनेंचा वाढदिवस
-‘लाड’क्या ठेकेदाराला लगाम, सुरक्षारक्षक पुरवण्याची निविदा विभागून दिली जाणार; नेमकं घडतंय काय?
-पुणेकरांच्या बाकरवडीत बनवाबनवी; ‘चितळे स्वीट होम’वर गुन्हा दाखल
-पालिका करणार थेट कंपन्याकडून डांबर खरेदी मात्र, हात काळे केलेल्या अधिकाऱ्यांचं काय?