पुणे : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे पुणे दौऱ्यावर होते. प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यानिमित्त पुन्हा एकदा पुणे काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले आहे. पुणे शहर पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यांपुढे तक्रारींचा पाढा वाचला. पदाधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारींवरुन सकपाळ यांनी ‘मी काही सूचनापेटी नाही तक्रारी करू नका’, असे सांगत चांगलच सुनावलं आहे. अशातच आता पुणे काँग्रेस शहराध्यक्ष पदासाठी वेगवेगळी नावे चर्चेत असून विविध गटांकडून शहराध्यक्ष पदासाठी जोरदार लॉबिंग सुरु आहे.
पुणे शहराचा शहराध्यक्ष बदलावा यासाठी गेल्या काही काळापासून काँग्रेसमधीलच काही गट काम करत असल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीपुर्वीपासून शहराध्य बदलावा यासाठी काही नेत्यांनी जोरदार प्रयत्न केले होते. मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. त्यातच विधानसभा निवडणुकीपूर्वी देखील काँग्रेसच्या एका गटाने नाना पटोलेंकडे शहराध्य बदलाची मागणी केली होती. नाना पटोलेंकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने काँग्रेसच्या पुण्यातील गटाने थेट दिल्लीत शहराध्यक्ष बदलाची मागणी केली. त्यातही त्यांना अपयश आलं. त्यानंतर आता हर्षवर्धन सपकाळांकडे काही गटांकडून मागणी केली जात आहे.
दरम्यान, हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर महाराष्ट्रात पक्षसंघटना मजबूत करतील, संघटनात्मक फेरबदल करतील असे निश्चित मानून पुण्यातील काँग्रेसच्या शहराध्यक्ष बदलासाठी काँग्रेसच्याच काही गटांकडून जोरदार लॉबिंग सुरु आहे. आता काँग्रेसचे शहराध्यक्ष बदलणार का? काँग्रेसचा अंतर्गत कलह मिटणार का हे पाहणं महत्वाचं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणला अन् पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला
-छत्रपती शिवरायांकडे खरंच वाघ्या नावाचा कुत्रा होता का? संभाजीराजेंनी दाखवले ‘ते’ फोटो
-विधानसभेच्या उपाध्यक्षपदी आण्णा बनसोडेंची बिनविरोध निवड; उद्या होणार घोषणा