पुणे : पुणे शहरामध्ये जीबीएस (गुइलेन बॅरी सिंड्रोम) या आजाराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात जीबीएस रुग्णांची संख्या आता शंभरी पार केली आहे. तर या जीबीएसने आतापर्यंत दोघांचा बळी घेतला आहे. यावर पुणे महापालिकेने तातडीने उपाययोजना न केल्या नाहीत. या आजारावर गांभीर्याने उपाय योजना करणं गरजेचं असताना पालिकेने वेळकाढूपणा केला. यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांनी आता या प्रकरणी महापालिकेच्या एका माजी आयुक्तांना या आजाराबाबतचा सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या अधिकाऱ्यांकडून सर्व संबंधिकांशी संपर्क साधून याबाबतची माहिती संकलीत करण्यास देखील सुरवात झाली आहे.
शहरात GBS आजाराचे रुग्ण वाढत असतानाच पालिकेचा ढिसाळ कारभार समोर आला आहे. पालिका प्रशासनाने वेळीच यावर उपाययोजना न केल्यामुळे खुद्द मुख्यमंत्र्यांना या प्रकरणाची दखल घ्यावी लागली आहे. यामध्ये पिंपरीमधील ३२ वर्षीय महिला आणि धायरीतील (मूळ रा. सोलापूर) एका ४० वर्षीय पुरुषाला आपला जीव गमवावा लागला आहे.
‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’ अंतर्गत या आजाराच्या उपचारासाठी असलेल्या दरांच्या मयदित दुपटीने वाढ करण्यात आली आहे. पूर्वी ही योजना असलेल्या खासगी रुग्णालयांना योजनेकडून ८० हजार रुपये दिले जात होते. ती आता दुप्पट करत एक लाख ६० हजार करण्यात आली आहे. त्यामुळे ही योजना असलेल्या रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अजितदादांच्या विश्वासू नेत्याची मुजोरी; अद्याप अटक नाही, अजित पवार म्हणाले…
-पुण्यात १ रुपयात ड्रेसची ऑफर महागात; महिलांनी लावली रांगच राग, दुकानदार गायब
-‘गुइलेन बॅरी सिंड्रोम’ आजाराचा खर्च परवडेना! राज्य सरकार आणि महापालिका मदत करणार