पुणे : पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक बाब समोर आली आहे. मंगळावारी पहाटे झालेल्या या घटनेने पुणे शहरासह संपूर्ण महाराष्ट्राला हादरुन सोडणारी घटना घडली. पुणे पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला आज (२८ फेब्रुवारी) पुणे पोलिसांनी पहाटे अटक केली आहे. आरोपी दत्तात्रय गाडेला अटक करण्यासाठी पोलिसांनी ड्रोन कॅमेरा वापरला होता. तब्बल २०० ताफा आरोपीच्या शिरुरमधील गुनाट या गावात शोध कार्यासाठी दाखल झाला होता. अखेर आज आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी अटक केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देत महत्वाची माहिती सांगितली आहे.
“आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक करण्यात आलं आहे. आरोपी लपून बसलेला होता. पण पोलिसांनी वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करत आरोपीला शोधून काढलं. तसेच लवकरच या संपूर्ण घटनेचा पर्दाफाश होईल. या घटनेबाबतची काही माहिती पोलीस आयुक्तांनी दिली. या घटनेबाबतची काही माहिती आता देणं योग्य नाही, योग्य स्टेजला आल्यानंतर ती माहिती दिली जाईल. मात्र, या घटनेचा घटनाक्रम काय? याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
“या प्रकरणातील सर्व गोष्टी तपासात समोर आल्यानंतर त्यावर सविस्तर बोलणं योग्य आहे. आता पोलिसांनी आरोपीला अटक केलं असून त्यानंतर आरोपीला आज न्यायालयात हजर केलं जाईल. त्यानंतर आरोपीची चौकशी होईल. तसेच काही टेक्निकल डिटेल्स आमच्याकडे आलेले आहेत. तसेच काही फॉरेन्सिक डिटेल्स देखील आलेले आहेत. याची सर्व माहिती एकत्र करून याबाबत बोलणं योग्य राहील”, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘मी अत्याचार केला नाही, आमच्यात सहमतीने संबंध झाले’; दत्ता गाडेचा पोलिसांसमोर धक्कादायक दावा
-स्वारगेट अत्याचार: पुणे पोलिसांनी अखेर आरोपीच्या मुस्क्या आवळल्या; कुठे सापडला दत्तात्रय गाडे?