पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थाप झाल्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आमदार छगन भुजबळ यांना स्थान देण्यात आले नव्हते. त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी उघड उघड आपली नाराजी व्यक्त केली होती. आजही पुन्हा एकदा भुजबळांनी खंत बोलून दाखवली आहे. आज महात्मा फुले वाड्याच्या रखडलेला कामाच्या निमित्ताने पुन्हा एकदा छगन भुजबळ यांनी आपण फक्त आमदार असल्यास म्हणत अप्रत्यक्षपणे खंत व्यक्त केल्याचे पहायला मिळाले आहे.
जेव्हापासून महात्मा फुलेवाडा देशाला अर्पण करण्यात आला तेव्हापासून आणि त्यापूर्वी पासून अनेक लोक याठिकाणी येतात. इथे सभा घेण्यासाठी जागा नाही. अनेक वर्षे जागा मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे. हे १०० ते २०० कोटींचे काम आहे. यासाठी अनेक वर्षे प्रयत्न करून देखील प्रयत्नांना यश येत नाही. जागा ताब्यात घेण्याचा वेग शून्य आहे. जमीन अधिग्रहणाबाबत पालिका अधिकारी नुसते टोलवा टोलवी करत आहे. यामध्ये प्रगती न झल्यास आंदोलन करण्याची वेळ येईल, असा देखील इशारा छगन भुजबळ यांनी दिला.
सरकारमध्ये असताना देखील फुलेवाड्याच्या कामासाठी आंदोलन का करावं लागतं? असं विचारलं यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले, ‘हा प्रश्न सरकारला विचारायला हवा. या ठिकाणी जे मंत्री, पालकमंत्री आहेत यांना विचारायला हवा. मी फक्त सरकामधील घटक पक्षाचा आमदार आहे. त्यामुळे मी उपोषण करायला मोकळा आहे. बाकीच्या जबाबदारी असल्या तर थोडीशी अडचण होते’, असं म्हणत भुजबळांनी मंत्रिपदाबाबत खंत व्यक्त केल्याचे पहायला मिळाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-दीनानाथ रुग्णालय प्रकरणात भाजप आमदाराचा यूटर्न; जयंत पाटलांनी शेअर केला ‘तो’ व्हिडीओ
-पालिका निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या हालचाली, पडद्यामागं नेमकं काय घडतंय?
-‘जर रस्ता व्हावा ही इच्छाच असती तर….’, सुप्रिया सुळेंच्या उपोषणावर अजितदादांचा टोला
-ठाकरे सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; शहरप्रमुख म्हणाले, ‘राजीनाम्याचे पत्रच फेक’