पुणे : पुण्यासह राज्याला उन्हाचा चटका लागला आहे. मार्च महिन्याच्या अखेरीपासून तर तापमानाचा पारा चांगलाच वाढत आहे. राज्याभरात उन्हाच्या कडाक्यामुळे उष्माघाताचे रुग्ण आढळून आले आहेत. दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढतोय तसेच उष्माघाताचेही प्रमाण वाढत आहे. वाढत्या उष्णतेच्या अनुषंगाने आरोग्य विभागाकडून काळजी घ्या आणि थेट भर दिवसाच्या उन्हाशी थेट संपर्कात जाणं टाळा. म्हणजेच दुपारी १२ ते ३ च्या दरम्यान उन्हात जाणं शक्य तितके टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्यात शुक्रवारी राज्यातील सर्वाधिक ४३.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. विदर्भात आज, शनिवारीही उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातही पुढील ३ दिवस रात्रीच्या उकाड्यात वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तर राज्यात पुढील २ दिवस पारा तापमानाचा पारा ४० अंशांवरच राहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान सरासरी ४० अंशांवर होते. विदर्भात पारा सरासरी ४२ अंशांवर होता. मराठवाड्यात सरासरी तापमान ४० अंश होते. कोकण किनारपट्टीवर सरासरी कमाल तापमान ३२ अंश नोंदवण्यात आले. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी कमाल तापमानात अलिबागमध्ये ३.४, डहाणूत १.६, कुलाब्यात १.५ अंश सेल्सिअसने वाढ झाली. पुढील २ दिवस तापमान वाढ कायम राहण्याचा अंदाज वर्तवला असून उष्माघाताचेही प्रमाण वाढत असल्याने त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
महत्वाच्या बातम्या-
-भोसरीत आढळराव पाटलांची ताकद वाढली! विलास लांडे लागले प्रचाराला; नेमकं गणित जुळलं कसं?
-मोहोळांच्या प्रचारासाठी भाजपची फिल्डिंग! पक्षाचे १० हजार कार्यकर्ते पोहचणार १२ लाख नागरिकांपर्यंत
-‘फडणवीस साहेब, इथं खरंच खूप त्रास होतोय’; अंकिता पाटलांनी फडणवीसांसमोर वाचला तक्रारींचा पाढा